• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • फडणवीस म्हणाले हे तीन चाकी सरकार अन् अजितदादांनी रिक्षा चालवून दाखवला, VIDEO

फडणवीस म्हणाले हे तीन चाकी सरकार अन् अजितदादांनी रिक्षा चालवून दाखवला, VIDEO

बारामतीमध्ये आज अजित पवार यांनी चक्क एक रिक्षा स्वत: चालवून उपस्थितींना आश्चर्याचा धक्का दिला.

बारामतीमध्ये आज अजित पवार यांनी चक्क एक रिक्षा स्वत: चालवून उपस्थितींना आश्चर्याचा धक्का दिला.

बारामतीमध्ये आज अजित पवार यांनी चक्क एक रिक्षा स्वत: चालवून उपस्थितींना आश्चर्याचा धक्का दिला.

  • Share this:
बारामती, 28 ऑगस्ट : काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार (mva government) हे तीन चाकी रिक्षाचे सरकार आहे, अशी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) नेहमी करत असतात. त्यामुळे काय की, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांची टीका मनावर घेत थेट तीन चाकी रिक्षाच (electric rickshaw) चालवली. (Ajit Pawars trial of electric rickshaw) त्याचं झालं असं की, बारामतीमध्ये आज अजित पवार यांनी चक्क एक रिक्षा स्वत: चालवून उपस्थितींना आश्चर्याचा धक्का दिला. बारामतीच्या पियाजिओ कंपनीने इलेक्ट्रीक रिक्षा तयार केली आहे. आज अजित पवार यांनी पियाजिओ कंपनीला भेटी दिली. या भेटीच्या वेळी अजितदादांनी इलेक्ट्रीक रिक्षाची चक्कर मारली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीत दौऱ्यावर आहेत. भल्या पहाटेपासून त्यांच्या कामांचा झंझावात सुरू आहे. एका कंपनीच्या कार्यक्रमादरम्यान पियाजिओ कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाची त्यांनी बारकाव्याने पाहणी केली. बलात्कार प्रकरणातील संशयिताचं टोकाचं पाऊल; साताऱ्यातील बालसुधारगृहात संपवलं जीवन बाजारात इलेक्ट्रीक कार, दुचाकी आल्या आहेत. पण आता रिक्षा सुद्धा इलेक्ट्रीक आली आहे. अजित पवारांनी या रिक्षाची पाहणी केली आहे. त्यांनी या रिक्षाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. त्यानंतर रिक्षा चालू केली आणि मस्त पैकी एक फेरफटका मारून आले. इलेक्ट्रिक रिक्षाची त्यांनी स्वतःहा चालवत चक्क सफर करत ट्रायल घेतली. अजित पवार हे कोणती गोष्ट टिकावू व व्यवस्थित निटनेटकी आहे का याची स्वतः खात्री करून घेतात याची आज पुन्हा प्रचिती आली. अजित पवारांच्या या रिक्षा ट्रायलमुळे उपस्थित सर्वच अवाक झाले.
Published by:sachin Salve
First published: