Home /News /maharashtra /

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच, 'आदित्य' हा शब्द मागे घेतो : अजित पवार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच, 'आदित्य' हा शब्द मागे घेतो : अजित पवार

भाजपकडून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबादारी दुसरीकडे सोपवावी, असा टोला लगावण्यात येत होता. त्यानंतर आज कोरोना आढावा बैठकीआधी अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं.

पुढे वाचा ...
पुणे, 15 जानेवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राज्याचे 'मुख्यमंत्री आदित्य ठाकरे' असा उल्लेख केला होता. त्यांच्या या उल्लेखामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. खरंतर राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे पर्यावरण मंत्री आहेत. उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे रुग्णालयात होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. पण ते त्यानंतर कोणत्याही खुल्या कार्यक्रमात दिसले नाहीत. याशिवाय विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही (Assembly Winter Session) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे भाजपकडून (BJP) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबादारी दुसरीकडे सोपवावी, असा टोला लगावण्यात येत होता. त्यानंतर आज कोरोना (Corona) आढावा बैठकीआधी अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवारांकडून ते विधान अनावधानाने झालं की त्यांनी जाणीवपूर्वक ते विधान केलं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण या चर्चांना अखेर अजित पवारांनी कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूर्णविराम दिला. अजित पवारांचं स्पष्टीकरण नेमकं काय? आदित्य यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी हातवारे करुन विनादी शैलीत उत्तर दिलं. "मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्याठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. आमच्यात असा कोणताही गैरसमज नाही. आमचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच आहेत", असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. हेही वाचा : सेल्फ किट विकत घेऊन कोरोनाची चाचणी करताय? अजित पवारांनी सांगितले नवे बदल अजित पवार नेमकं काय म्हणाले होते? कोरोना आढावा बैठकीच्याआधी पत्रकारांनी काही कडक निर्बंध लावण्यात येतील का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असा उल्लेख केला होता. "नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील", असं अजित पवार म्हणाले होते. 'विनामास्क फिरणाऱ्या 9 हजार 270 नागरिकांवर कारवाई' "नियमांची शिस्त लागण्याकरता दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला होता. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड, मास्क वापरलं नाही आणि थुंकला तर 1000 रुपये दंड जाहीर केला आहे. विनामास्क फिरणाऱ्या 9 हजार 270 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून 46 लाख 35 हजार रुपये दंड वसूल केलेला आहे. अजूनही दुर्देवाने काही लोक विनामास्क फिरत आहेत. त्या सगळ्यांना माझं आवाहन आणि विनंती आहे, आपल्याला मास्क वापरलाच पाहिजेय", असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या