मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आधी बसू मग बोलू', अजितदादा निघाले 'मातोश्री'कडे, 'वंचित'वर करणार चर्चा!

'आधी बसू मग बोलू', अजितदादा निघाले 'मातोश्री'कडे, 'वंचित'वर करणार चर्चा!

 पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीवर चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही विषयावर चर्चा करणार आहे

पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीवर चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही विषयावर चर्चा करणार आहे

पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीवर चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही विषयावर चर्चा करणार आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

पुणे, 24 जानेवारी : शिवसेनेनं वंचित आघाडीसोबत युती केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वंचितला विरोध होता पण उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज त्यांची भेट घेणार आहे. वंचितसोबत संबंध जुळले तर पुढे याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधानही अजितदादांनी केलं.

वंचित आघाडी आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र, जागवाटपावरून वाद पेटण्याची चिन्ह आहे. अजित पवार यांनी शिवसेनेनं आपल्या कोट्यातून जागा द्यावी अशी भूमिका घेतली होती. तर उद्धव ठाकरेंनी वंचित महाविकास आघाडीचाच घटक असणार आहे, असं स्पष्ट केलं. त्यावर आज अजितदादांनी प्रतिक्रिया दिली.

आज आमच्या बैठकीमध्ये पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीवर चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही विषयावर चर्चा करणार आहे. आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत ताकद उद्धव ठाकरे यांची आहे, अशी माहिती अजितदादांनी दिली.

("श्री पोपटलाल यांना लवकरच....", संजय राऊत-किरीट सोमय्यांमध्ये सुरू होणार कायदे..)

'वंचितसोबत संबंध जुळले तर पुढे याबाबत निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडीसोबत आपआपले मित्र पक्षाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे. काँग्रेस पाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही कसब्याची जागा मिळावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीत एकमत होणार का ? असा प्रश्न आहे तर दुसरीकडे भाजप मात्र महाविकास आघाडीतील पक्षांच्या दुहेरी भुमिकेमुळे आनंदात आहे.

(दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री!)

कसबा विधानसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी अशी मागणी आज शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली.  तर काँग्रेसकडून माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर हे इच्छुक आहेत. आघाडीच्या जागावाटपावेळी ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्याने या जागेवर काँग्रेसच लढेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. उमेदवार कुणीही असला तरी तो काँग्रेसचाच असेल हे नक्की म्हणत त्यांनी शिवसेनेची मागणी धुडकावून लावली.

First published:

Tags: Ajit pawar