गंमत कराल तर जंमतच करून टाकेल, अजितदादांनी उपटले कार्यकर्त्यांचे कान, पाहा हा VIDEO

गंमत कराल तर जंमतच करून टाकेल, अजितदादांनी उपटले कार्यकर्त्यांचे कान, पाहा हा VIDEO

दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असा प्रकार जर खपवून घेणार नाही. करायचं असेल तर उघड करा.

  • Share this:

जितेंद्र जाधव, बारामती

बारामती, 20 फेब्रुवारी  : 'दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असा प्रकार जर खपवून घेणार नाही. करायचं असेल तर उघड करा. पण, का कुणी गमंत करायचं विचार करत असेल तर जमंतच करून टाकेन, आता कुणाचं ऐकणार नाही. राष्ट्रवादी पक्षाने तुम्हाला पदे दिली आहे. त्यामुळे गद्दारी केल्यास लक्षात ठेवा', असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पदाधिकार्‍यांना दिला.

निलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगवी, पणदरे येथे सभा घेतल्या या वेळी पवार बोलत होते. यावेळी, अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये चौफेर फटकेबाजी केली.  माळेगाव कारखाना चालवणार्‍या भाजपने जेव्हा बारामती, इंदापूरचे नीरा देवधर धरणातून मिळणारे पाणी बंद केले होते. नीरा डावा कालवाच्या पाण्याचा निर्णय जर मी घेतला नसता तर उन्हाळ्यात पिकांची धूळधाण झाली असती तुम्ही शेतकरी असला तर कारखाना ताब्यात द्या, पाच वर्षे चांगला दर देण्याची जबाबदारी माझी राहील, असं आश्वासन अजित पवार यांनी निरावागज इथं जाहीर सभेत दिलं.

तसंच, 'तुम्ही शेतकरी असला तर कारखाना ताब्यात द्या, पाच वर्षे चांगला दर देण्याची जबाबदारी माझी राहील. नागरी सत्काराच्या वेळी मी सारे काही योग्य करेन, असे म्हटलं होतं. त्या पद्धतीने केलं अर्थात फलटण, पंढरपूर, माळशिरस, सांगोला या कोणत्याही तालुक्यावर अन्याय केलेला नाही. आम्ही समन्यायी निर्णय घेतला सत्ता असतानाही शेजार धर्म पाळला आहे. जे कारखाना चालवतात त्यांनी तुमचे पाणी बंद केले होते. भाजपावाले बंद पाईप मधून पाणी आणणार असल्याची त्यांची कल्पना होती. मात्र, त्यामुळे पाणी अभावी पिके जळाली असती, पण आता तसं होणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.

 

'माझी चौकशी लावली'

सरकार त्यांचे असताना माझी चौकशी लावली, मी काहीच बोललो नाही. हा त्यांचा अधिकार होता. म्हणून प्रत्येक घटनेला सामोरं गेलो. आता तुम्ही कारखान्याची माहिती द्या मी कारभाराची चौकशी लावतो. आता दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, असंही अजितदादा म्हणाले.

फोनचे रेकॉर्डिंग काढणार

निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे खपवून घेणार नाही. जे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते आहे. त्यांनी काही गमंत करायचं ठरवलं तर पार जमंतच करून टाकेन. आतापर्यंत खूप सहन केलं, सगळ्यांसाठी काम केलं पण आता असं होऊ देणार नाही. जर का असा प्रकार लक्षात आल्यास पंधरा दिवसातील फोनचे रेकॉर्डिंग काढणार आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे हे लक्षात ठेवा, राष्ट्रवादी पक्षाने तुम्हाला पदे दिली आहे. त्यामुळे गद्दारी केल्यास लक्षात ठेवा असा सज्जड दम अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना दिला.

बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेची झालेले माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक की प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिवसभरात आपल्या मतदारसंघात तीन गावांमध्ये सभा घेऊन सभासदांनी राष्ट्रवादीच्या निलकंठेश्वर पॅनल मतदान करावं असं आवाहन केलं.

First published: February 20, 2020, 11:23 PM IST

ताज्या बातम्या