EXIT POLL 2019 : बारामतीमध्ये अजित पवारांसाठी निवडणूक अवघड, न्यूज 18 लोकमत आणि IPSOS चा अंदाज

EXIT POLL 2019 : बारामतीमध्ये अजित पवारांसाठी निवडणूक अवघड, न्यूज 18 लोकमत आणि IPSOS चा अंदाज

बारामतीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी निवडणूक अवघड आहे, असा न्यूज 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज आहे. अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यात अटीतटीची लढत आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : बारामतीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी निवडणूक अवघड आहे, असा न्यूज 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज आहे.

अजित पवार यांच्याविरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली. गोपीचंद पडळकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये आले आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी थेट अजित पवार यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली. त्यामुळे बारामतीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शरद पवार यांच्यावरही ईडीने गुन्हा दाखल केला. याच घडामोडींमध्ये अजित पवारांचं नाराजीनाट्य पाहायला मिळालं. अजितदादा राजकीय संन्यास घेण्याच्या मन:स्थितीत होते. पण नंतर मात्र त्यांनी इथून निवडणूक लढवली. आता या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

काय आहेत अंदाज?

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदात EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

==========================================================================================

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 07:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading