अजितदादांचा राजीनामा, पार्थसाठी आहे का हा अट्टाहास?

अजितदादांचा राजीनामा, पार्थसाठी आहे का हा अट्टाहास?

रोहित पवारांना झुकतं माप मिळत असल्यामुळे अजितदादा नाराज आहेत का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पवार कुटुंबातला वाद या राजीनाम्याला कारणीभूत आहे का, हाही प्रश्न विचारला जातोय.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांनाही वडिलांच्या राजीनाम्याबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे तर या राजीनाम्याचं गूढ वाढलं आहे.

'मला राजीनाम्याबद्दल माहीत नाही, माहिती घेऊन सांगतो', अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली. त्याचवेळी पार्थ पवारला विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीमधून उमेदवारी द्यावी, अशी अजितदादांची मागणी होती, अशीही चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा मावळमधून पराभव झाला. त्यानंतर त्यांनी विधानसभा लढवावी, अशी अजितदादांची इच्छा असावी, अशी माहिती आहे.

पवार कुटंबीयांमध्ये गृहकलह असावा, अशी शंका भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार हे कर्जत जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.पण आता मात्र त्यांना बारामतीमधून उमेदवारी द्यावी यावरही विचार सुरू आहे.

(हेही वाचा : अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा, कारण गुलदस्त्यात, गूढ वाढलं)

मागच्या वेळी लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली होती. त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवारांबद्दल एक फेसबुक पोस्ट केली होती. शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घ्यायला नको होती, असं रोहित पवार म्हणाले होते.

रोहित पवारांना झुकतं माप मिळत असल्यामुळे अजितदादा नाराज आहेत का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पवार कुटुंबातला वाद या राजीनाम्याला कारणीभूत आहे का, हाही प्रश्न विचारला जातोय. पार्थ पवार यांनी अजितदादांच्या राजीनाम्याबदद्ल फोनवरून प्रतिक्रिया दिली पण रोहित पवार यांनी मात्र माध्यमांशी बोलणं टाळलं आहे. ते फोन उचलत नाहीत, अशीही माहिती आहे.

===============================================================================================

VIDEO : कुणालाही न सांगता अजित पवारांनी दिला राजीनामा

Published by: Arti Kulkarni
First published: September 27, 2019, 7:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading