Home /News /maharashtra /

...म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले, अजित पवारांचा टोला

...म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले, अजित पवारांचा टोला

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातल्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून (Cabinet Expansion) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टार्गेट केलं आहे.

पुढे वाचा ...
    बारामती, 5 ऑगस्ट : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातल्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून (Cabinet Expansion) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्र्यांवर प्रचंड भार आलाय, त्यामुळे ते आजारी पडले आहेत. हाच भार सगळ्यांमध्ये वाटला तर ताण कमी होईल, असं अजित पवार म्हणाले आहेत. 'काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. काय निकाल लागतोय म्हणून विस्तार करत नाहीत का, अशी शंका आहे. यांनी 40 लोकांना मंत्री करतो, असं सांगितलं का? भाजपच्या काहींचे चेहरे इतके पडले आहेत की काही बोलायला नको. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारभार पाहत आहेत. राज्यातली विकासकामं खोळंबली आहेत. सगळी जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे, तर फडणवीसांकडे कोणतंही खातं नाही,' असा टोला अजित पवारांनी हाणला. 'एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली, महिन्याभरात मंत्रिमंडळ विस्तार नाही, खातेवाटप नाही. अतिवृष्टीने नुकसान झालं आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री आणणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. कृतीतून लोकांना मदत करा,' असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. 'सरकार येतं जातं, पण विकासकामं पुढे तशीच सुरू ठेवायची असतात. जनहिताच्या निर्णयांना स्थगिती देण्याचं काम या दोघांच्या सरकारने केलंय, राज्यात याआधी असं घडलं नव्हतं. महाविकासआघाडीने अनेक चांगले निर्णय घेतले, ते कोणत्या हेतूने बदलले माहिती नाही,' अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात रात्री उशीरा स्पीकर सुरू राहिल्यावरूनही अजित पवारांनी टीका केली. 'आम्ही सांगतो नियमाने वागा. रात्री 10 नंतर स्पीकर बंद, आता मुख्यमंत्री फिरत आहेत. रात्री दीड काय दोन काय, स्पिकर चालूच. पोलीस काही बोलत नाहीत. पोलीस म्हणतात, आमच्या घड्याळात 10 च वाजले आहेत. मी राज्यपालांनाही ही बाब सांगितली. कायद्याचं पालन व्हायला पाहिजे, कोणीही असलं तरी नियमांचं पालन गरजेचं आहे,' अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde

    पुढील बातम्या