Home /News /maharashtra /

...नाहीतर तुमचाच पंचनामा होईल, गृहराज्यमंत्र्यांसमोरच अजितदादांनी पोलिसांना सुनावले

...नाहीतर तुमचाच पंचनामा होईल, गृहराज्यमंत्र्यांसमोरच अजितदादांनी पोलिसांना सुनावले


'सगळ्यांनी कौतुक केलं इमारत खूप चांगली आहे. पण, इमारत ही अजिबात काही चांगली नाही.

'सगळ्यांनी कौतुक केलं इमारत खूप चांगली आहे. पण, इमारत ही अजिबात काही चांगली नाही.

'सगळ्यांनी कौतुक केलं इमारत खूप चांगली आहे. पण, इमारत ही अजिबात काही चांगली नाही.

सातारा, 25 सप्टेंबर : 'अशा प्रकारच्या निकृष्ट दर्ज्याच्या बांधण्यात आलेल्या पोलीस स्टेशनचा ( police station) उद्घाटनाला बोलवताना अधिकाऱ्यांनी 50 वेळा विचार करून मगच मला बोलवा, नाहीतर तुमच्या कामाचा पंचनामा होईल' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पोलीस अधिकाऱ्यांना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांच्यासमोर सुनावले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळपासून वेगवेगळ्या विकासकामांची पाहणी करत उद्घाटनसोहळे त्यांच्या हस्ते पार पडत आहे.  साताऱ्यातील खटाव तालुक्यात वडूज येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस स्टेशनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी बोलत असताना पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या दर्जाबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. 'सगळ्यांनी कौतुक केलं इमारत खूप चांगली आहे. पण, इमारत ही अजिबात काही चांगली नाही. त्याचा पोच हा समोर आलेला आहे.आतमध्ये ज्या दर्जाचं काम करायला पाहिजे, होतं तसं सुद्धा काम झालं नाही.  जमिनीची लेव्हल सुद्धा चांगली नाही. जर पोलिसांनी कुणाला सांगितलं असतं तर रोडरोलर कुणी तरी भेट दिला असता, असा टोला अजित पवारांनी लगावला. RBI ची कारवाई, बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेवर प्रशासक नियुक्त जनतेच्या पैशांवर सरकार चालत आहे, त्यांचा पैसा हा नीटपणे वापरला गेला पाहिजे. अशा प्रकारच्या निकृष्ट दर्ज्याच्या बांधण्यात आलेल्या पोलीस स्टेशनचा उद्घाटनाला बोलवताना अधिकाऱ्यांनी 50 वेळा विचार करून मगच मला बोलवा, नाहीतर तुमच्या कामाचा पंचनामा होईल आणि तुमची बदनामी होईल' अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले. विशेष म्हणजे, व्यासपीठावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या समोरच अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. KBC: कोणता होता 25 लाखांसाठीचा प्रश्न ज्यावर सुनील शेट्टी-जॅकीची दौड थांबली? त्यानंतर महाबळेश्वर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत बोलत असताना ते म्हणाले, 'जर त्या मुलीने किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आधीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असती तर मुलाला दत्तक देण्याचा प्रकार घडला नसता. घडलेली घटना अत्यंत वाईट आणि लाजिरवाणी आहे. मात्र पालकांनी सुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे' असंही पवार म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: पोलीस

पुढील बातम्या