Home /News /maharashtra /

'रोखठोक' अजित दादांचा भर मंचावरुन नितेश राणेंसह नवाब मलिकांनाही टोला, म्हणाले....

'रोखठोक' अजित दादांचा भर मंचावरुन नितेश राणेंसह नवाब मलिकांनाही टोला, म्हणाले....

अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या याच स्वभावाचं आज पुन्हा दर्शन झालंय. ते आज कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान रत्नागिरीत भाषण करत असताना त्यांनी थेट मंचावरुन नवाब मलिक आणि नितेश राणे यांना टोला लगावला.

पुढे वाचा ...
रत्नागिरी, 26 डिसेंबर : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना बघून भाजप आमदार नितेश राणे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर म्याँव-म्याँव असा आवाज काढला होता. या आवाजावरुन विधानसभा आणि विधान परिषदेत मोठं घमासान बघायला मिळालं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मांजर आणि कोंबडीचा मॉर्फ केलेला फोटो ट्विटरवर शेअर करत नितेश राणेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी डुकराचा मॉर्फ केलेला फोटो शेअर करत मलिकांना प्रत्युत्तर दिलं. नवाब मलिक आणि नितेश राणे यांच्या या ट्विटरवॉरवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांना खेडेबोल सुनावले आहे. 'जाणीव ठेवा, हे कोणीच करु नये' अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या याच स्वभावाचं आज पुन्हा दर्शन झालंय. ते आज कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान रत्नागिरीत भाषण करत असताना त्यांनी थेट मंचावरुन नवाब मलिक आणि नितेश राणे यांना टोला लगावला. "आम्ही फक्त बोलत नाही. आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे महाविकास आघाडी सरकारमधील प्रतिनिधी आहोत. त्याची जाणीव आपण ठेवा. काहीजण नुसते आरोप-प्रत्यारोप करतात. मी सध्या सोशल मीडियावर बघतोय. कोण कोंबड्याला मांजर करतंय. तर कुणी मांजराला कोंबडा करतंय. यातून कोकणच्या विकासाचे मुद्दे सुटणार आहेत का? महाराष्ट्राचा विकास होणार आहे? ते थोडावेळ बघायला बरं वाटेल. हे कोणीच करु नये", अशा शब्दांत अजित पवार यांनी सुनावलं. हेही वाचा : अधिवेशनात नितेश राणेंच्या 'म्याँव-म्याँव'वरुन घमासान, थेट निलंबनाची मागणी, काय-काय घडलं? "आपण बोलत असताना विकासाचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून काम केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपल्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला. त्या जन्माचं सार्थक होईल. एकमेकांची उणीदुणी काढून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन, एकमेकांबद्दल कारण नसताना गैरसमज लोकांच्या मनात पसरवून काहीच होणार नाही", असं अजित पवार म्हणाले. नेमका वाद काय? विधानभवाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे आमदार 23 डिसेंबरला घोषणाबाजी करत होते. या दरम्यान आदित्य ठाकरे विधान भवनावर पोहोचले. ते विधान भवनात प्रवेश करत असताना पाऱ्यांवर आंदोलन करत असणाऱ्या आमदारांपैकी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आदित्य ठाकरेंकडे बघून म्याँव-म्याँव असा आवाज काढला. यावेळी त्यांच्या आजूबाजूच्या आमदारांमध्ये हशा पिकला. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेत बघायला मिळाले होती. हेही वाचा : पृथ्वीराज चव्हाण थेट दिल्लीला सोनिया गांधींच्या भेटीला, काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय? शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधीमंडळाचे प्रधान सचिवांना पत्र लिहून प्राण्यांचे विचित्र आवाज येत असल्यामुळे विधीमंडळाचं सदस्यांचं लक्ष विचलित होत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे या बेवारस प्राण्यांची गांभीर्याने पाहणी करुन त्यांचा बंदोबस्त करण्याचा सुरक्षा रक्षकांना आदेश द्यावेत, अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केली होती. तर विधानसभेत शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी केली होती.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या