अजित पवार यांचं सभागृहातलं वजन वाढलं, नेतेपदी निवड झाल्याने चर्चा

अजित पवार यांचं सभागृहातलं वजन वाढलं, नेतेपदी निवड झाल्याने चर्चा

नेतेपदी निवड झाल्यामुळे अजित पवार यांचं सभागृहातील स्थान आणखीनच बळकट झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : विधान परिषदेचे कामकाज आज अवघ्या 13 व्या मिनिटाला संपलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदाची घोषणा झाली. यापूर्वी सुभाष देसाई सभागृहाचे नेते होते. नेतेपदी निवड झाल्यामुळे अजित पवार यांचं सभागृहातील स्थान आणखीनच बळकट झालं आहे.

अजित पवारांचं सरकारमधील प्रस्थ आणखीन वाढलं आहे, अशी चर्चा या निमित्ताने विधिमंडळात सुरु झाली आहे. या पदाच्या निमित्ताने सभागृहातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर अजित पवार यांची सभागृह नेते म्हणून भूमिका महत्त्वाची असणार आहे. सभागृहात पेचप्रसंग निर्माण झाल्यास त्यावर मार्ग काढणे, विरोधकांशी संवाद साधणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अजित पवार यांच्याकडे असणार आहेत.

सुभाष देसाई यांच्यापेक्षा अजित पवार यावर अधिक प्रभावीपणे काम करतील याची खात्री असल्याने त्यांच्याकडे हे पद देण्यात आल्याची चर्चा आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या नावासंदर्भातील घोषणा केली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महिला अत्याचार याविषयांवर स्थगन मांडण्याचा प्रयत्न केला. पण सभापती निंबाळकरांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे भाजप आमदारांनी वेलमधे येऊन घोषणा केली.

नाशिक पालिकेत भाजप नगरसेवकांचा राडा, अंतर्गत कलह चव्हाट्यावर

‘ शेतक-यांची फसवणूक करणा-या सरकारचा धिक्कार असो’ विधान परिषदेत घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान गोपीकिशन बाजोरिया, अनिकेत तटकरे, अनिल सोले, दत्तात्रय सावंत आणि सुधीर तांबे यांची तालिका सभापतीपदी घोषणा करण्यात आली.

याशिवाय जीएसटी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अध्यादेश आणि महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन हे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. त्यासोबतच 2019 च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्याशिवाय 2014-15, 2015-16, 2016-17 या वर्षांच्या अतिरिक्त खर्चांच्या मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2020 08:28 PM IST

ताज्या बातम्या