अजित पवारांचा राजीनामा : सुनेत्रा पवारांची नाराजी की पवारांचा मास्टरप्लॅन?

अजित पवारांचा राजीनामा : सुनेत्रा पवारांची नाराजी की पवारांचा मास्टरप्लॅन?

अजित पवार यांनी राजीनाम्याचं कुठलंही कारण दिलेलं नाही. पक्षातल्या नेत्यांना काही कल्पना नाही. त्यामुळे आता वेगवेगळ्या शक्यता समोर येत आहेत. मुलगा पार्थ याच्या राष्ट्रवादीतल्या भवितव्यावरून सुनेत्रा पवार नाराज होत्या, असंही बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : ऐन निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ उडाली. अजित पवार मुंबईतच असल्याची बातमी मिळाली. पण त्यांचा फोन लागला नाही. याविषयी अजित पवार यांनी कुठलंही कारणही दिलेलं नाही. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा ई मेल केला आणि बागडे यांनी तो मंजूर केला.

सुनेत्रा पवार होत्या नाराज

ईडीच्या चौकशीआधीच राजीनामा दिल्यानं गूढ वाढलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना या राजीनाम्याची कल्पना नव्हती. ED ने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवारांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे त्यात दिसले नाहीत. त्याऐवजी रोहित पवार मात्र सावलीसारखे शरद पवारांबरोबर होते. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली, तेव्हापासूनच पवार कुटुंबीयांतले मतभेद उघड होत गेले. गेले काही दिवस अजित पवार गेले काही दिवस  निर्णय प्रक्रियेपासून दूर होते.

हे वाचा - ..यावरून नाराज आहेत अजित पवार, म्हणूनच दिला अचानक राजीनामा?

पार्थ पवार यांच्या राष्ट्रवादीत भवितव्याविषयी अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार नाराज होत्या, असं बोललं जातं. पार्थला विधानसभेचं तिकीट मिळावं यासाठीही त्या आग्रही होत्या असं काही माध्यमांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांचं शरद पवारांच्या जवळ असणं आणि त्यांचं पक्षातलं वाढतं महत्त्व, माध्यमांमधून मिळणारी प्रसिद्धी हेही कारण या राजीनाम्यामागे असू शकेल का याविषयी चर्चा होत आहेत.

राजीनाम्याला अर्थ नाही तरीही...

राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला माहिती न देता अजित पवार यांनी अचानकपणे राजीनाम्याचा निर्णय घेतला. ते उदयनराजेंविरोधात लोकसभेच्या पोटनिवडणुकीला उभे राहणार का की आणखी कुठली जबाबदारी त्यांना मिळणार याविषयी चर्चा सुरू झाली. वास्तविक अगदी काही दिवस आधी राजीनामा दिला हे अनाकलनीय आहे. त्याची काहीच तांत्रिकदृष्ट्या नव्हती.

संबंधित - अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा, कारण गुलदस्त्यात, गूढ वाढलं

पक्षातल्या काही घडामोडींमुळे ते नाराज असल्याची चर्चाही आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात अस सूचक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. पवार कुटुंबीयांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये मतभेद होते अशी चर्चा आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारी आणि पराभवातून सुनेत्रा पवारही होत्या नाराज होत्या, असं बोललं जातं. राणा जगजितसिंह यांचा भाजप प्रवेश सुनेत्रा आणि अजित पवार यांच्या सल्ल्यानेच झाल्याचीही चर्चा आहे. पार्थ पवार यांनी मात्र या निर्णयाविषयी आपल्याला माहिती नाही असं सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते जयदेव गायकवाड यांना याविषयी विचारलं असता, निर्णयप्रक्रियेत अजितदादा नाहीत, असं वाटत नाही. पवार कुटुंबीय एकत्र येऊन गर्दी करत नाहीत. त्यामुळे ते आंदोलनापासून लांब राहिले असावेत. मरगळ आलेला पक्ष चर्चेत ठेवण्यासाठी पवारांचा काही मास्टरप्लॅन असू शकतो, असंही काही समर्थक म्हणत आहेत.

०------------------------------------------------------

VIDEO : कुणालाही न सांगता अजित पवारांनी दिला राजीनामा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या