मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'तिकडे कुणाचा बळी द्यायला चालले', मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर अजितदादांचा निशाणा

'तिकडे कुणाचा बळी द्यायला चालले', मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर अजितदादांचा निशाणा

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार कुटुंबासह उद्या गुवाहाटीला जाणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि आमदारांच्या या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 25 नोव्हेंबर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार कुटुंबासह उद्या गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीला हे आमदार कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार सहकुटुंब सकाळी 9 वाजता मुंबई विमानतळावरून गुवाहाटीसाठी निघणार आहेत. दुपारी 12 वाजता सर्व आमदार गुवाहाटीमध्ये दाखल होणार आहेत. आमदारांच्या या गुवाहाटी दौऱ्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.

गुवाहाटीला जाताय, तिकडे बकरे, कोंबडे, रेडे कापतात. कुणाचा बळी द्यायला चालले आहात? असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. कुणाचा बळी द्यायला चालले आहेत माहिती नाही. दर्शनाला चालले असतील तर आपण एकमेकांना शुभेच्छा देतो, असं अजित पवार म्हणाले.

दुसरीकडे आमदारांना रेडे म्हणणं हा लोकप्रतिनिधींचा अपमान आहे. हे आमदार 5 लाख लोकांनी निवडून दिले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

गुलाबरावांची टोलेबाजी

दरम्यान गुवाहाटीला उद्या 40 रेडे जाणार आहेत, पण मी जाणार नाही, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. जिल्हा दूध संघाची निवडणूक आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. निवडणुकीमुळे मला गुवाहाटीला जाता येणार नाही. मी जरी जाणार नसलो तरी आमचे बाकीचे सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणार आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी दौऱ्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही 50 लोक गुवाहाटीला जाणार आहोत. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावले आहे. आम्ही तिथे जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहोत. देवीचे आर्शीवाद घेणार आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही कोणतंही काम लपून, छपून करत नाही तर उघड करतो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना देखील टोला लगावला आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Eknath Shinde