माढ्यामध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला? अजित पवार म्हणतात...

माढ्यामध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला? अजित पवार म्हणतात...

राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात आता नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार, याची जोरदार चर्चा आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे, 21 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात आता नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार, याची जोरदार चर्चा आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादीने माढ्यातून विजयसिंह यांना तुम्ही लढा असं सांगितलं होतं. पण त्यांनी दुसरंच नाव दिलं. त्या नावाला माळशिरस वगळता माण-खटाव, फलटण सगळीकडून विरोध होता. नंतर त्यांनी फोनच बंद करून ठेवला होता. आता आम्ही माढ्यामध्ये नवीन तरुण उमेदवार देणार आहोत,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी केलेल्या या विधानानंतर माढ्यातून राष्ट्रवादी नक्की कुणाला तिकीट देणार, याबाबत अंदाज बांधण्यात येत आहेत. सध्या तरी राष्ट्रवादीकडून संजय शिंदे आणि प्रभाकर देशमुख यांचं नाव चर्चेत आहे.

रणजितसिंह माढ्यातून भाजपचे उमेदवार?

रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपकडून माढ्यातील उमेदवार असणार आहेत, अशी माहिती आहे. माढ्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे आता रणजित सिंह मोहिते- पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे.

SPECIAL REPORT : माढ्यानंतर शरद पवारांचा 'प्लॅन B'!

First published: March 21, 2019, 1:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading