कथित बँक घोटाळ्याच्या गदारोळावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार, म्हणाले...

कथित बँक घोटाळ्याच्या गदारोळावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार, म्हणाले...

बँक घोटाळ्याच्या आरोपांबद्दल शिवस्वराज्य यात्रेत अजित पवरांनी भाष्य केलं आहे.

  • Share this:

बीड, 24 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील इतर नेत्यांचीही नावं चर्चेत आली. या सगळ्या आरोपांबद्दल शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांनी भाष्य केलं आहे.

'कोर्टाने 75 लोकांबाबतीत निकाल दिला आहे. त्या बँकेच्या एकाही लोन कमेटीला आणि एक्झिक्युटिव्ह कमेटीला मी हजर नाही. 75 लोकांपैकी भाजपचे हयात नसलेले मंत्री भाऊसाहेब फुंडकर देखील होते. शिवसेनेचे केंद्रातील माजी अर्थमंत्री यांचाही त्यात समावेश आहे. पण मीडिया मात्र फक्त अजित पवार अजित पवार करत आहे. काय माझ्याबद्दल त्यांना एवढे प्रेम आहे. या बँक प्रकरणात मी एक रुपयात सुध्दा मिंदा नाही हे जाहीर भाषणात सांगतो,' असं म्हणत अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

'सातबारा कोरा करणार'

आमचं सरकार सत्तेवर आलं तर सहा महिन्यात सातबारा कोरा करू, नाहीतर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं आश्वासन परळी शहरात झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.

दुसरीकडे, अजित पवार यांनी वैद्यनाथ कारखान्यातील एफआरपीच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना टार्गेट केलं आहे. 'मंत्र्यांचे कारखाने योग्य भाव देत नसतील, एफआरपीप्रमाणे भाव देत नसतील आणि तेच कायदे मोडत असतील तर चुकीचं आहे. 15 दिवसांच्या आत जर पैसे दिले नाही तर बारा टक्के व्याज दिले पाहिजे हा कायदा आहे. त्यामुळे त्यांना सोडू नका. तुमच्या कष्टाचा पैसा आहे,' असं म्हणत अजित पवारांनी पंकजा मुंडेंवर तोफ डागली.

भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे भोसले काय म्हणाले? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 10:46 AM IST

ताज्या बातम्या