नगरची जागा नक्की कुणाची? अजित पवारांनी केला FINAL खुलासा

नगरची जागा नक्की कुणाची? अजित पवारांनी केला FINAL खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला दिली असल्याचं सांगितल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या.

  • Share this:

पुणे, 3 मार्च : आघाडीत अहमनगरच्या लोकसभा मतदारसंघावरून पुन्हा एकदा तिढा निर्माण झाला आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत खुलासा केला आहे. ही जागा राष्ट्रवादीचीच असून संभ्रमावस्था निर्माण करू नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला दिली असल्याचं सांगितल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांनी असं कुठलंही विधान केलं नसल्याचं म्हटलं. आणि त्यानंतर आता अजित पवार यांनीही ही जागा राष्ट्रवादीचीच असल्याचं म्हटलं आहे.

एक जागा...एक पक्ष आणि तीन वक्तव्य, कोण काय म्हणाले?

अजित पवार

'अहमदनगरची जागा राष्ट्रवादीच लढणार आहे. शरद पवारांनी दुसरा कुठलाही खुलासा केला नव्हता,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील

काँग्रेस राष्ट्रवादीत अहमदनगर लोकसभेच्या जागेचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे. राष्ट्रवादीने ही जागा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चिरंजीवासाठी सोडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याचे खंडन केलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, काही प्रसारमाध्यमांनी अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षासाठी सोडली असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. असा कोणताही निर्णय झालेला नसून याबद्दलच्या बातम्या तथ्यहीन आहेत.

शरद पवार काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूजमध्ये बोलताना अहमदनगरची जागा ही काँग्रेससाठीच असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे नगरमधून सुजय विखे पाटलांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा होती. तसेच अहमदनगरच्या बदल्यात राष्ट्रवादीने औरंगाबादची जागा आपल्याकडे घेतल्याचंही म्हटलं जात होतं.

काय आहे नगरच्या जागेचा वाद?

लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. नगरची जागा मिळत नसल्यामुळे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांचा मुलगा सुजय विखे - पाटलांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला. जवळपास सुजय विखे पाटील यांनी अपक्ष लढवण्याचीही तयारी केली. .

राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या अहमदनगरच्या जागेवर डॉ. सुजय विखे यांनी दावा करुन प्रचार सुरु केला होता. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे ˆ पाटील यांनीही यासाठी राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तरीही राष्ट्रवादीकडून सकारात्मक उत्तर न आल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना यासाठी विनंरी केली होती. यावर शरद पवार यांनी ही जागा सुजय विखेंसाठी सोडली असल्याचे अकलूज येथे बोलताना स्पष्ट केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांनी मात्र आता या वृत्ताचे खंडण करत असा निर्णय झालाच नसल्याचं म्हटले आहे.

VIDEO : शिवसेना राष्ट्रवादीत राडा, धनंजय मुंडेंचा पोलिसांवर गंभीर आरोप

First published: March 3, 2019, 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading