उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर: महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप आला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेनं कुणालाच संपूर्ण बहुमत दिलं नाही. कोणतेही दोन पक्ष किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन सरकार स्थापन करावं लागणार होतं.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता संघर्ष सुरु झाला. महिन्याभरापासून चर्चा आणि बैठका सुरु होत्या मात्र त्यातून कोणताही ठोस तोडगा निघत नव्हता. नुसत्या चर्चा करुन मार्ग निघत नव्हता. नको तेवढ्या मागण्या वाढत होत्या अशा परिस्थितीत स्थिर सरकार कसं स्थापन करणार हा प्रश्न होताच. त्यामुळे भाजपने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी मी चांगल्या पद्धतीनं पार पाडेन. दोघांनी एकत्र येऊन केव्हाही स्थीर सरकार स्थापन करणं राज्याच्या दृष्टीनं हिताचं असतं. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. याबाबत सुरुवातीच्या काळात शरद पवारांना माहिती देण्यात आली होती असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2019 09:03 AM IST

ताज्या बातम्या