राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार ड्रायडंट हॉटेलवर कुणाला भेटायला गेले?

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार ड्रायडंट हॉटेलवर कुणाला भेटायला गेले?

अजित पवार ड्रायडंट हॉटेलवर कुणाला भेटण्यासाठी गेले. काय चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात?

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे (प्रतिनिधी )मुंबई, 26 नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले अजित पवार आज भल्या सकाळी हॉटेल ट्रायडंटमध्ये दाखल झाले. गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी अजित पवार यांची भेट भेतली होती. त्यांची मनधरणी करून उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणीही करण्यात आली होती.  त्यांना पुन्हा पक्षात येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. खरंतर मुंबईच्या तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार राहात आहेत. पण आज भल्या सकाळी ट्रायडंटमध्ये नेमके कोणाला भेटण्यासाठी गेले होते, हे कळायला मार्ग नाही. पण आजच्या न्यायालयाच्या निकालाला काही अवघे 2 तास बाकी असतांना मुंबईत घडामोडींना वेग आलाय.. सूत्रांच्या माहितीनुसार काल रात्री शरद पवार आणि सुप्रिया सुळे काही काळ ट्रायडंटमध्ये गेले होते. त्यामुळे ड्रायडंटवर अजित पवार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंना भेटण्यासाठी गेले असावेत का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्यापही कायम आहे. महाराष्ट्राच्या राजकारण रोज नव्या वळणावर पोहोचत आहे. अजित पवार ड्रायडंट हॉटेलवर पोहोचले आहेत. अजित पवार एवढ्या सकाळी कुणाला भेटायला गेले असावेत याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार राष्ट्रवादीत परतणार? उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाच नाही!

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपला मदत करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज अजित पवार आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार होते. मात्र अजित पवार विधानभवनात पोहचले आणि पदभार न स्वीकारताच घरी परतले आहेत.

अजित पवार विधानभवनात पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही तिथे दाखल झाले. त्यानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांमध्ये तब्बल 4 तास बैठक चालली. ही बैठक संपताच अजित पवार यांनी पदभार न स्वीकारता घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचा मार्ग खुला ठेवला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2019 08:17 AM IST

ताज्या बातम्या