मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काँग्रेसच्या दोन मागण्या, अजित पवारांनी केला थेट विरोध

काँग्रेसच्या दोन मागण्या, अजित पवारांनी केला थेट विरोध

महाविकासआघाडीमध्ये काँग्रेसने (Congress) घेतलेल्या दोन भूमिकांचा अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोध केला आहे, त्यामुळे भविष्यात महाविकासआघाडीमधली (Mahavikas Aghadi) धुसफूस आणखी वाढणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 फेब्रुवारी : महाविकासआघाडीमध्ये काँग्रेसने (Congress) घेतलेल्या दोन भूमिकांचा अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोध केला आहे, त्यामुळे भविष्यात महाविकासआघाडीमधली (Mahavikas Aghadi) धुसफूस आणखी वाढणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम (EVM) व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कायदा महाराष्‍ट्र विधानमंडळाने तयार करावा, अशा स्पष्ट सुचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिल्या होत्या. अजित पवार यांनी मात्र याबाबत वेगळं मत मांडलं आहे.

'नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. लोकसभा निवडणूक सुद्धा ईव्हीएम मशीनद्वारेच होत असते. सर्वत्र कॅशलेस निवडणुका घेण्याचे सुरू आहे. आता सर्वत्र मशीनद्वारे मतदान होत असताना तश्याच पद्धतीने मतदान व्हायला पाहिजे', अशी ठाम भूमिका अजित पवारांनी मांडली.

ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी पर्याय द्या, विधानसभा अध्यक्षांची सूचना

दुसरीकडे उपमुख्यमंत्रीपद मिळवण्याबाबत काँग्रेस आग्रही आहे, त्यासाठी विधानसभा अध्यक्षपद सोडायलाही काँग्रेस तयार असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे. यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. महाविकासआघाडी निर्माण होताना ज्या गोष्टी ठरल्या होत्या, त्याप्रमाणे होणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

काय आहे फॉर्म्युला?

सकाळे दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसमधला एक गट उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आग्रही आहे, पण कोणतेही अधिकार नसलेले उपमुख्यमंत्रीपद घेऊन विधानसभा अध्यक्षपद सोडायला काही नेत्यांचा विरोध आहे. भाजपनं कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही आमदार फोडण्याचे प्रयत्न केले, तर विधानसभा अध्यक्षपद महत्त्वाचं ठरतं, त्यामुळे हे पद सोडायला काँग्रेस मधल्याच काही नेत्यांनी विरोध केल्याचं सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे शिवसेनेनं मात्र याबाबत सावध भूमिका घेतली आहे. अध्यक्षपद आमच्याकडे येत असेल, तर चांगलं नाही का? याबाबत चर्चा करायला काय हरकत आहे, असं शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितल्याचं वृत्त दैनिक सकाळने दिलं आहे.

First published: