Home /News /maharashtra /

महिलेची तक्रार आल्यास..,अजित पवारांनी केली पोलिसांना सुचना

महिलेची तक्रार आल्यास..,अजित पवारांनी केली पोलिसांना सुचना

'असा कडक कायदा करायचं काम चालू आहे. कुणाच्या आईकडे, बहिणीकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत होणार नाही'

अहमदनगर, 07 मार्च :  राज्यातील महिलांसाठीचा कायदा कडक करणार आहोत, तर पोलिसांनी कुठल्याही महिलेची तक्रार आल्यास घरच काम आहे असं समजून कारवाई करावी, अशी सुचना वजा मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. कर्जत जामखेड मतदार संघातील माहेजाळगाव येथे आयोजित महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान योजनेचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षेबद्दल लवकरच कठोर कायदा करणार अशी माहिती दिली. 'असा कडक कायदा करायचं काम चालू आहे. कुणाच्या आईकडे, बहिणीकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत होणार नाही. पोलिसांनाही माझी विनंती आहे की, पोलिसांनी कुठल्याही महिलेची तक्रार आल्यास घरच काम आहे असं समजून कारवाई करावी, असं आवाहनही अजित पवारांनी केली. तसंच यावेळी त्यांनी dptc मधील निधीतून पोलिसांसाठी ३ टक्के निधीदेणार असल्याचंही सांगितलं. नगर जिल्ह्याने बारा पैकी 9 जागा काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्षाला निवडून दिल्या. यामध्ये प्राजक्त तनपुरे आणि शंकरराव गडाख मंत्री झालेत. याच जिल्ह्यातून रोहित पवारांना कर्जत जामखेडच्या मतदारांनी विजयी केलं. पण याच नगर जिल्ह्यातून अनेक जण उमेदवारी घेण्यास मागे सरकत होते. आमचा रोहित पवार यांच्यासारखे धाडसाने निवडणुकीत उभारायचं असतं, असं सांगत अजित पवार यांनी रोहित यांचं कौतुक केलं. शिर्डीमध्ये लढत ही अडचणीची होती. तिथे फार काही अपेक्षा होती.  जिकडे सुर्य उगवतो तिकडेच त्यांचा कल असतो. पण, यावेळी झालं वेगळंच त्यांना वाटलं सुर्य उगवले तिकडे. पण, सुर्य उगवला इकडं आणि ते गेले तिकडे, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या शैलीत राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला. 'दिशा गुन्हे कायदा लवकरच महाराष्ट्रात' दरम्यान, राज्यातील महिलांवरील अत्याचार आणि हल्ल्यांना प्रतिबंध घालण्याबरोबरच आरोपींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आंध्र प्रदेशातील दिशा कायदा लवकरच महाराष्ट्रातही आणणार लागू करण्यात येणार आहे. राज्यात दिशा कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. गृहमंत्री म्हणाले, महिलांवरील अत्याचार आणि हल्ल्यांच्या घटना थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरोपींना तातडीने आणि कठोर शिक्षा करण्यासंदर्भात आंध्रप्रदेश सरकारने दिशा कायदा केला आहे. त्याच धर्तीवर राज्यात हा दिशा कायदा लागू करण्यात येणार आहे. दिशा कायदा महाराष्ट्रात करण्यासाठी आणि अधिक सुधारित स्वरूपात लागू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दिशा सारखा कायदा आणण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचं काम हा कायदा करेल. दरम्यान, आंध्र प्रदेश विधानसभेत 'दिशा विधेयक' मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार बलात्कार प्रकरणात 21 दिवसांत निकाल लावला जाईल आणि दोषी आढळल्यास त्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या कायद्याला 'आंध्रप्रदेश दिशा गुन्हे कायदा 2019' असे नाव देण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ajit pawar, NCP

पुढील बातम्या