Home /News /maharashtra /

BREAKING : अजितदादांनी सांगितलं शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचे कारण, म्हणाले...

BREAKING : अजितदादांनी सांगितलं शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचे कारण, म्हणाले...

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी सोपवली आहे. पण वर्ष झाले तरी काही निर्णय झाला नाही.

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी सोपवली आहे. पण वर्ष झाले तरी काही निर्णय झाला नाही.

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी सोपवली आहे. पण वर्ष झाले तरी काही निर्णय झाला नाही.

    अहमदनगर, 06 एप्रिल : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आहे. पण, गेल्या दीड वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा रखडला आहे, त्यामुळे त्यांनी भेट घेतली असावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शिर्डीतील पोलीस स्टेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर भाष्य केलं. 'मी सकाळी 7 वाजता निघालो, त्यानंतर शिर्डीला आलो, त्यानंतर कोपरगावला आलो. मुंबईला गेल्यानंतर मला अधिक माहिती मिळणार आहे. पण पाठीमागच्या काळामध्ये पवारसाहेबांनी भेट घेतली होती. निवडून आलेल्या आमदारांनी रितसरपणे राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी सोपवली आहे. पण वर्ष झाले तरी काही निर्णय झाला नाही. उलट असं सांगण्यात आले की, आमच्या वरिष्ठांशी बोला. त्यामुळे शरद पवार हे आज दिल्लीत आहे, त्यांनी हा विषय त्यांच्या कानी टाकला असू शकतो, असं अजित पवार यांनी सांगितलं. (गोरखनाथ मंदिर हल्ल्यासंदर्भात नवा खुलासा! मुर्तझाच्या घरातून Airgun जप्त) दरम्यान, नवी दिल्लीत एकीकडे तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.  विशेष म्हणजे, भाजपचा आज पक्ष स्थापन दिवस आहे. त्यामुळे सकाळपासून पंतप्रधान मोदी कार्यक्रमात व्यस्त होते. याच व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना भेट दिली. (लवकरच Karthik इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पुन्हा खेळू शकतो, Plessis ने दिले संकेत) विशेष म्हणजे, शरद पवार यांनी आधी सर्व आमदार आणि खासदारांची बैठक घेतली होती. या वेळी संजय राऊत सुद्धा उपस्थितीत होते. आमदार आणि खासदारांसोबत चर्चेनंतर आज शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचले. या भेटीत काय  चर्चा झाली, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Ajit pawar, PM narendra modi, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या