मोदींनी महिलांना कसला बोडक्याचं सन्मान दिला-अजित पवार

मोदींनी महिलांना कसला बोडक्याचं सन्मान दिला-अजित पवार

"जे जास्त ऊसाचं गाळप करतील, कारखान्यात जास्त ऊस देतील त्यांची प्रगती होईल जे घालणार नाही त्यांना 'बांबू' मिळतील "

  • Share this:

04 जुलै :  अजित पवार कुठं काय बोलतील याचा नेम नाही. साताऱ्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांच्या त्यांच्या खास शैलीत एक मंत्र दिला. जे जास्त ऊसाचं गाळप करतील, कारखान्यात जास्त ऊस देतील त्यांची प्रगती होईल जे घालणार नाही त्यांना 'बांबू' मिळतील असा सल्लावजा टोला अजित पवारांनी लगावला. तसंच गॅस सिलेंडर देऊन मोदी सरकारने कुठल्या बोडक्याचा महिलांना सन्मान दिला असा टोलाही त्यांनी लगावला.

अजित पवार आपल्या भाषणातून कधी घसरतील सांगता येत नाही. त्याचा प्रत्यय आज सातारा शहरात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पाहायला मिळाला. विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावर जाहिरात करताना 2 कोटी महिलांना सम्मान दिल्याचे फ्लेक्स बोर्ड लावले आहेत. याविषयी बोलताना कसला महिलांचा सन्मान...बोडक्याचा सन्मान दिलाय असं बोलल्यानंतर एकच हशा पिकला.

तसंच दोन कोटी महिलांना सिलेंडर वाटले असं सांगणाऱ्या मोदींनी सिलेंडरचे भाव किती वाढले हे सांगितलं नाही असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केलाय.

यावेळी सरपंच जनतेतून निवडला जाणार असेल तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सुद्धा का निवडले जाऊ नयेत असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ईडीकडून जी चौकशी सुरू आहे या बाबत विचारले असता अजित पवार यांनी ईडीच्या चौकशी ला सामोरे जात आहेत आणि पूर्ण सहकार्य करत असल्याचं त्यांनी यावेळी कबूल केलं.

खंडणी आणि मारहाण प्रकरणी खा.उदयनराजे जर दोषी असतील तर त्यांचा पाठीशी पक्ष राहणार नसल्याचे राष्ट्रवादीचे भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली आहे.

First published: July 4, 2017, 9:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading