शेतकऱ्यांनो संपावर जाऊ नका, अजित पवारांचं आवाहन

शेतकऱ्यांनो संपावर जाऊ नका, अजित पवारांचं आवाहन

इतरांचे संप वेगळे त्यांना महिन्याला पगार मिळतात. मात्र शेतकऱ्याचं घर चालणार कसं असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केलाय.

  • Share this:

18 मे : शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलंय. इतरांचे संप वेगळे त्यांना महिन्याला पगार मिळतात. मात्र शेतकऱ्याचं घर चालणार कसं असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केलाय. शेतकऱ्याने कष्ट केलेल्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी आपण लढू असं सांगत अजित पवारांनी शेतकऱ्यांना संपावर न जाण्याचं आवाहन केलंय.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा आज रायगडनंतर चिपळूणमधील सावर्डेत दाखल झाली. आज बांद्यात या यात्रेचा समारोप होणार आहे. या संघर्ष यात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आरपीआयचे जोगेंद्र कवाडे, माजी खासदार निलेश राणे, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव, संजय कदम यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

First published: May 18, 2017, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading