#कोपर्डीचानिकाल : नराधमांना लवकरात लवकर फाशी द्यावी-अजित पवार

#कोपर्डीचानिकाल : नराधमांना लवकरात लवकर फाशी द्यावी-अजित पवार

फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली गेली पाहिजे अशी मागणीही अजित पवारांनी केली.

  • Share this:

29 नोव्हेंबर : कोपर्डी प्रकरणातील नराधम आरोपींची फाशीची निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली गेली पाहिजे अशी मागणीही पवारांनी केली.

अखेर कोपर्डी प्रकरणातील तिन्ही नराधामांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही समाधान व्यक्त केलं आहे. त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत सर्व महिलांना आता शांततेनं आणि समाधानाने समाजात वावता येणार आहे.  त्यामुळे खरंच या निर्णयामुळे सगळ्याच महिलांचा विजय झाला आहे आणि यानंतर असं निर्घृण कृत्य करण्याऱ्यांवरही जबर बसले असा विश्वास पवारांनी व्यक्त केलाय.

तसंच दोषी हे पुढे उच्च न्यायालयात जाऊ शकतात, त्यावेळी राज्य सरकारने सक्षमपणे बाजू मांडून ही शिक्षा कायम राहील असा प्रयत्न करायला हवा आणि फाशीच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबाजवणी करावी अशी मागणी पवारांनी केली.

First published: November 29, 2017, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading