सामनाच्या अग्रलेखावर अजित पवारांचा पलटवार, म्हणाले...'शिवसेना गांडूळ आहे'

सामनाच्या अग्रलेखावर अजित पवारांचा पलटवार, म्हणाले...'शिवसेना गांडूळ आहे'

निवडणुका आल्या की प्रभु रामचंद्राची आठवण येते पण स्वत:च्या वडिलांचे स्मारक करा हे सांगण्यात माझं काय चुकलं असं अजित पवार म्हणाले आहेत.

  • Share this:

विकास भोसले, प्रतिनिधी

कोल्हापूर, 27 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. निवडणुका आल्या की प्रभु रामचंद्राची आठवण येते पण स्वत:च्या वडिलांचे स्मारक करा हे सांगण्यात माझं काय चुकलं असं अजित पवार म्हणाले आहेत. ते कोल्हापूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेच्या राम मंदिर मुद्द्यावर गेल्या काही दिवसांत अजित पवार यांनी जोरदार टीका केली होती. 'ज्यांना स्वतःच्या वडिलांचं गेल्या 5 वर्षांत स्मारक बांधता आलं नाही ते अयोध्येत जाऊन राम मंदिर काय बांधणार', असा खोचक सवाल अजित पवार यांनी विचारल होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यासंबंधी आजच्या शिवसेनेच्या सामना या आग्रलेखातही अजित पवारांवर बाण रोखण्यात आला. 'मुतऱ्या तोंडाचे अजित पवार...!' असं म्हणत सामनातून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

दरम्यान, यासगळ्यावर आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सामना पेपर आम्ही वाचत नाही. ते विनाशकाले विपरित बुद्धी आहे असं पवार म्हणाले आहेत. शिवसेना लोकांना भावनिक करून मतं मिळवते. शिवसेनेची भाषा शिवराळ आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असं अजित पवार म्हणाले आहेत.

VIDEO : बापाचं स्मारक बांधता न येणारे अयोध्येत काय दिवा लावणार - अजित पवार

मी बाळासाहेबांच्या मुद्द्यावर बोललं म्हणून शिवसेनेला मिरच्या झोंबल्या. पण मी शिवसेनेला किंमत देत नाही. सत्तेत सहभाग दाखवायचा अन विरोध करायचा म्हणजे शिवसेना गांडुळ असल्याची घणाघाती टीका अजित पवार यांनी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर शिवसेना पक्ष चालला आहे. उद्धव ठाकरेंची भुमिका दुटप्पी आहे. पण कावळयाच्या शापाने कधी गुरे मरत नाही. जलसंपदाच्या भ्रष्टाचार चौकशीसाठी मी कधीही तयार आहे. गरळ ओकण्यापेक्षा सत्ताधारी म्हणून चौकशी करा असं आवाहन अजित पवार यांनी शिवसेनेला दिलं आहे.

सर्व समविचारी पक्षांना एकत्र करून मनसे बाबत काही दिवसात निर्णय होईल अशी महत्त्वाची घोषणाही यावेळी अजित पवार यांनी केली.

VIDEO : नक्कल करतो म्हणून गर्दीत नाचणाऱ्या तरुणाला घातली गोळी; वाल्मिकी जयंती उत्सवातली घटना

First published: October 27, 2018, 3:48 PM IST

ताज्या बातम्या