मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुख्यमंत्री चांगलं शिकलेले आहेत, त्यांना असं बोलणं शोभत नाही? - अजित पवार

मुख्यमंत्री चांगलं शिकलेले आहेत, त्यांना असं बोलणं शोभत नाही? - अजित पवार

'45 जागा जिंकणार, एवढ्याच कशाला 48 जागाही जिंका ना.'

'45 जागा जिंकणार, एवढ्याच कशाला 48 जागाही जिंका ना.'

'45 जागा जिंकणार, एवढ्याच कशाला 48 जागाही जिंका ना.'

    वैभव सोनवणे, पुणे 11 फेब्रुवारी : आता बारामती जिंकणार ही मुख्यमंत्र्यांची घोषणा पवारांना चांगलीच झोंबलीय. सोमवारी अजित पवार यांनी या वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उच्च विद्याविभूषीत आहेत. त्यांना विरोधकांना तुच्छ लेखणं शोभत नाही अशी टीका अजित पवारांनी पुण्यात बोलताना व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणताहेत 45 जागा जिंकणार, एवढ्याच कशाला 48सही जागा जिंकू असं त्यांनी म्हटलं पाहिजे. बोलताना काही तारतम्य ठेवलं पाहिजे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे. सुसंस्कृतपणा आहे. त्यामुळे त्याचा आदर्श ठेवला पाहिजे. उच्च विद्याविभूषित असलेल्या मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभत नाही " गोयल आणि पाटलांनी लोकांमधून निवडून यावं केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरही अजित पवारांनी टीका केली. गोयल आणि पाटील हे कधीच लोकांमधून निवडून आले नाहीत. त्यांनी पहिले लोकांमधून निवडणून यावं आणि नंतर बोलावं असंही अजित पवार म्हणाले. काय म्हणाले होते मुख्यमंत्री? पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या बुथ प्रमुखांना संबोधित करताना मुख्यमंत्री आणि अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं. यावेळी बारामतीची जागाही जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी 45 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि भाजपचं मिशन बारामतीही जाहीर करून टाकलं. आता मुख्यमंत्रीही पवारांवर बरसले म्हटल्यावर मग अमित शहांनीही पक्ष कार्यकर्त्यांकडून यावेळी बारामती जिंकण्याचा संकल्प वदवून घेतला. गेल्यावेळी बारामतीची जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडली होती. पण, यावेळी भाजपच बारामतीची जागा लढणार असल्याचा निश्चय भाजपने करून टाकला. VIDEO: पवार आणि विखे कुटुंबातील राजकीय वैर संपुष्टात
    First published:

    Tags: Ajit pawar, Baramati, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, बारामती

    पुढील बातम्या