मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

"उपमुख्यमंत्री काही आम्हाला साथ देत नाहीत" यशोमती ठाकूर यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप

"उपमुख्यमंत्री काही आम्हाला साथ देत नाहीत" यशोमती ठाकूर यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

  • Published by:  Sunil Desale

अकोला, 22 ऑगस्ट : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DYCM Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भर कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी अजित पवार हे आपल्याला साथ देत नसल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

यशोमती ठाकूर म्हणाल्या, "बालसंगोपनाचे पैसे मागील कित्येक वर्षांपासून वाढवण्यात आले नव्हते. त्यांना 450 रुपये मिळत होते. आता आम्ही ते वाढवून 1125 रुपये केले. पण कमीत कमी 2500 रुपये मिळायला हवे असं आम्हाला वाटतं आणि तसा प्रस्ताव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री काही आम्हाला हवी तेवढी साथ देत नाहीत. म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तुम्ही बोललात तर साथ मिळेल."

पुणेकरांनो सावधान ! दिवसाढवळ्या महिलेला लुटले; पर्स चोरुन दोघांचा पोबारा, घटनेचा LIVE VIDEO

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांनी भाषण करताना अजित पवार सहकार्य करत नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थित होते.

यापूर्वीही अनेकवेळा महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी सरकारवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नाही, आमच्या खात्याला निधी दिला जात नाही अशा विविध तक्रारी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांनी जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केला आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Akola, Yashomati thakur