शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले अजित पवार, राजीनाम्याबाबत होणार चर्चा?

शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले अजित पवार, राजीनाम्याबाबत होणार चर्चा?

विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर आता ते शरद पवारांशी चर्चा करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर आता ते शरद पवारांशी चर्चा करणार आहेत.

अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देताना त्याची कल्पना कुणालाही दिली नव्हती. शरद पवारांनाही याबाबत माहिती नव्हती. त्यामुळे अजित पवार यांनी नेमका कोणत्या मुद्द्यावरून राजीनामा दिला, याची चर्चा कालपासून रंगत आहे. त्यामुळे आता शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार माध्यमांसमोर येऊन काय माहिती देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काका-पुतण्यामध्ये आधी फोनवरून चर्चा

अजित पवार यांनी फोनवरून शरद पवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला तुम्हाला भेटायचं आहे, असं शरद पवारांना सांगतलं. त्यावर शरद पवारांनी मुंबईत भेटू असं कळवल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्याची बैठक होणार आहे. या भेटीनंतर अजित पवार माध्यमांसमोर येणार का, हे पाहावं लागेल.

दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शरद पवार हे आपला नियोजित दौरा रद्द करून मुंबईत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबतच्या चर्चेनंतरच अजित पवार माध्यमांसमोर येतील, अशी माहिती आहे. त्यामुळे अजित पवार नक्की काय बोलतात, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

अजित पवारांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले शरद पवार?

अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी याबाबत खुलासा केला. 'आज दुपारी बैठका सुरू असताना राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांनी आमच्या कुणाशीही चर्चा केली नव्हती. मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क केला तर त्यांनी दिलेलं कारण समजलं. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी माझ्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे अजित पवार हे अस्वस्थ होते. राज्यातील राजकारणाची पातळी खालावली आहे. यातून बाहेर पडावं असा सल्लाही त्यांनी आपल्या मुलाला दिला होता,' असं शरद पवारांनी सांगितलं. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे अजित पवार नाराज झाले होते. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर चर्चा करेन, असंही पवार म्हणाले.

अजितदादांचा राजीनामा कुटुंब कलहातून? शरद पवारांची UNCUT मुलाखत

Published by: Akshay Shitole
First published: September 28, 2019, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading