जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ajit Pawar : मोठी बातमी! बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार सिल्व्हर ओकवर दाखल; काय आहे कारण?

Ajit Pawar : मोठी बातमी! बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार सिल्व्हर ओकवर दाखल; काय आहे कारण?

बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार सिल्व्हर ओकवर

बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार सिल्व्हर ओकवर

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार बंडखोरीनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 14 जुलै : राज्याच्या राजकाणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओकला दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिभा पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकला दाखल झाल्याची माहिती आहे. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या तब्बेची विचारपूस केली. बंडखोरीनंतर अजित पवार पहिल्यांदाच पवारांच्या निवासस्थानी खातेवाटपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सिल्व्हर ओकला दाखल झाले. प्रतिभा पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकला दाखल झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या तब्बेची विचारपूस केली. प्रतिभा पवार यांच्यावर आजच ब्रीज काँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया त्यांच्या हाताशी संबंधित होती. राष्ट्रवादी काँग्रेसने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली होती. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा विवाह 1967 साली झाला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ‘काकी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिभा पवार यांच्याकडे पक्षाचे पालक म्हणून पाहिले जाते. परंतु, त्या कधीही राजकारणात सक्रिय झाल्या नाहीत. प्रतिभा पवार यांचे वडील सदाशिव शिंदे हे भारतीय क्रिकेट संघात लेगस्पिनर होते. 1946 ते 1952 दरम्यान त्यांनी भारतासाठी सात कसोटी सामने खेळले. वाचा - भुजबळांचा येवल्यातून शरद पवारांना टोला; म्हणाले, तुम्ही अशाच चुका करा म्हणजे… प्रतिभा पवार राजकारणात नसून 2019 साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले तेव्हा त्यांना परत आणण्यात प्रतिभा पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याचा उल्लेख शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला होता. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात प्रतिभा पवार आणि अजित पवार यांच्यात अतुट नातं असल्याचे लिहिले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पवार त्यांच्या पुस्तकात लिहितात, “अजितचा भाऊ श्रीनिवास यांना त्यांच्याशी संवाद साधण्यास सांगण्यात आले होते. माझी पत्नी प्रतिभा आणि अजित यांचे घट्ट नाते आहे. प्रतिभा कधीच राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होत नाही. पण अजितचे प्रकरण कुटुंबाशी निघडीत होते.” मात्र, यावेळी अजित पवार आपल्या आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार गटानेही त्यांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केले आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात