मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भर सभेत अजित पवार चुकले, पॉझ घेतला अन् खळखळून हसले, Video

भर सभेत अजित पवार चुकले, पॉझ घेतला अन् खळखळून हसले, Video

अजित पवार चुकले अन् खळखळून हसायला लागले

अजित पवार चुकले अन् खळखळून हसायला लागले

बारामतीमधल्या जाहीर सभेत अजितदादांना आपण विधानसभेत असल्यासारखंच वाटलं, यानंतर त्यांनी एक चूक केली. अजित पवारांच्या या चुकीमुळे सभेमध्ये एकच हश्या पिकला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Baramati, India

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

बारामती, 27 मार्च : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याच्या कार्यक्षमतेविषयी विरोधकदेखील कौतुक केले असतानाच आज नकळतपणे बारामतीतील जाहीर सभेतच भाषण करत आसताना देखील त्याचा प्रत्यय आला. बारामतीमधल्या जाहीर सभेत अजितदादांना आपण विधानसभेत असल्यासारखंच वाटलं, यानंतर त्यांनी एक चूक केली. अजित पवारांच्या या चुकीमुळे सभेमध्ये एकच हश्या पिकला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी बोलता बोलता अचानक अध्यक्ष महोदय, असा शब्द उच्चारला आणि उपस्थितांमध्ये हास्याचा स्फोट झाला. त्यानंतर थोडा वेळ अजित पवार यांनी देखील पॉझ घेतला आणि तेदेखील हास्यात सहभागी झाले. सॉरी म्हणत हा सवयीचा परिणाम असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा उपस्थित कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये हास्याची लाट उसळली.

बारामती तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती, कृषी उत्पन्न बाजार समिती निरा-पुरंदर आणि बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

या सभेत बोलताना अजित पवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. विरोधक बारामतीत येतात आणि वाटेल त्या शब्दात टीका करतात. 75 वर्षातील 20 वर्ष सरकार होते, तेव्हा त्यांच्या नेत्यांनी बारामतीसाठी काय आणले हे दाखवा. विरोधात असलो तरी काही ना काही आणण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वाचळविरांकडे लक्ष देऊ नका, अशी टीका अजित पवारांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar