जेव्हा अपघातग्रस्ताच्या मदतीला अजितदादा धावून येतात!

जेव्हा अपघातग्रस्ताच्या मदतीला अजितदादा धावून येतात!

सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी महाबळेश्वर सातारा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाला तातडीची मदत केलीय.

  • Share this:

सातारा, 09 मे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील माणुसकीचे दर्शन पहायला मिळाले. सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी महाबळेश्वर सातारा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाला तातडीची मदत केलीय. संतोष जाधव हे दुचाकीवरून जात असताना रानडुक्कराने अचानक धडक दिल्याने रस्त्यावर  निर्जन ठिकाणी अपघातग्रस्त होऊन पडले होते.

त्याच रस्त्याने महाबळेश्वरवरून एक विवाहसोहळा आटपून अजित पवार जात होते. त्यावेळी अजितदादांनी तातडीने स्वतःची गाडी थांबवून जखमी युवकाला आपले युवा कार्यकर्ते रविराज तावरे लाखे आणि स्वीय सहायक सुनील मुसळे यांच्या मदतीने उचलून स्वतःच्या गाडीमधून सातारा येथील क्रांतिसिह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात पोचवण्याची  व्यवस्था केली आणि स्वतः फोन करून डॉक्टरांना जखमीच्या तब्येतीची खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या.एकुणच अजित पवारांच्या माणुसकीचे पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्ताने दर्शन झाले.

First published: May 9, 2018, 12:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading