उदय तिमांडे, प्रतिनिधी गडचिरोली, 8 जुलै : आज गडचिरोली जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार व आदिवासींचे नेते धर्मरावबाब आत्राम यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व आदिवासींचे नेते धर्मरावबाब आत्राम हे अजित पवार यांच्यासोबतच्या बंडात सहभागी आहेत. 2 जुलै रोजी त्यांनी अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी यापूर्वी तीननवेळा राज्यमंत्रीपद भूषविले होते. आता कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेऊन त्यांनी चौथ्यांदा मंत्रिमंडळात समावेश एंट्री केली आहे. वाचा - …म्हणून दुसरं गद्दारांचं टोळकं आणलं, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा मोठा दावा आत्राम यांचे शरद पवार यांना आव्हान आजच्या कार्यक्रमातून त्यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिलं आहे. आत्राम म्हणाले, आजचा कार्यक्रम उत्तम झालाय. पावणेसात लाख लोकांनी शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेतला. आम्ही ठरवलं प्रत्येक पक्षानं विरोधी पक्षातील एक एक आमदार महायुतीमध्ये आणायचा आहे. जिल्ह्यात अधिकारी कमी आहेत. ओबीसींच्या लोकांना अडचणी आहे ते मी मांडलं. विधानसभा अध्यक्षांचे क्षेत्र आहे. त्यांचे अधिकार आहे. त्यात आम्ही बोलणार नाही. जो निर्णय होईल. तो नियमानुसार होणार आहे. गडचीरोलीत धर्मरावबाबा म्हणजे राष्ट्रवादी, राष्ट्रवादी म्हणजे धर्मरावबाबा आहे, शरद पवार गडचिरोलीत आले तरी फरक पडणार नाही, असे थेट आव्हान आत्राम यांनी दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांचं कौतुक दरम्यान आज बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा त्याच गोष्टीचा उल्लेख केला आहे. मात्र यावेळी त्यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे, तर उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. गेल्या सरकारमध्ये अजितदादा आपण काही मागत नव्हतो, अहंकार आडवा येत होता. मागणार नाही तर मिळणार कसं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यावेळी अजित पवार यांनी देखील मान हलवून मुख्यमंत्र्यांना प्रतिसाद दिला.

)







