मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शरद पवार खरंच नाराज आहेत? उत्तर देताना अजित पवार मीडियावरच भडकले, Video

शरद पवार खरंच नाराज आहेत? उत्तर देताना अजित पवार मीडियावरच भडकले, Video

जयंत पाटील यांच्या निलंबनावरून शरद पवार अजित पवारांवर नाराज झाल्याचं बोललं जातंय, यावर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मीडियावरच घसरले आहेत.

जयंत पाटील यांच्या निलंबनावरून शरद पवार अजित पवारांवर नाराज झाल्याचं बोललं जातंय, यावर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मीडियावरच घसरले आहेत.

जयंत पाटील यांच्या निलंबनावरून शरद पवार अजित पवारांवर नाराज झाल्याचं बोललं जातंय, यावर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मीडियावरच घसरले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 24 डिसेंबर : जयंत पाटील यांच्या निलंबनावरून शरद पवार अजित पवारांवर नाराज झाल्याचं बोललं जातंय, यावर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मीडियावरच घसरले आहेत. पवार साहेब नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं. ते नाराज असल्याचा तुम्हाला फोन आला होता का? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी केला आहे.

'हे धाधांत खोटं आहे. तुम्हाला हे कुणी सांगितलं? पवार साहेबांनी फोन करून सांगितलं? तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मी साहेबांच्या रोज संपर्कात असतो. आपल्या ज्ञानामध्ये अशी कुणी भर घातली? तुम्हाला ब्रेकिंग न्यूज काही मिळत नाही, म्हणून अशाप्रकारच्या बातम्या तुम्ही पसरवता आणि लोकांच्या मनात समज गैरसमज निर्माण करता,' असं अजित पवार म्हणाले.

'विरोधी पक्षनेता म्हणून माझं काम कसं असावं हे मला कळतं. मी काही दुधखुळा नाही. मी 32 वर्ष राजकारण करणारा माणूस आहे, त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका,' अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

शरद पवार नाराज?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशनातून निलंबन झालं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे जयंत पाटील यांना या अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. निलंबनाच्या या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षनेते अजित पवारांवरच नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार हे सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे दिल्लीमधून शरद पवारांनी अजित पवारांना फोन केला आणि नाराजी व्यक्त केली, अशी माहिती समोर येत आहे. जयंत पाटील यांच्या निलंबनावर अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. अजित पवार यांनी सभागृहात माफी मागण्यापेक्षा कठोर भूमिका घ्यायला हवी होती. मात्र तसं न झाल्यानं शरद पवार हे अजित पवारांवर नाराज असल्याचं बोललं जातंय.

First published:

Tags: Ajit pawar, Jayant patil, NCP, Sharad Pawar