मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संजय राऊतांवर निशाणा साधताना भुसेंनी घेतलं शरद पवारांचं नाव, अजितदादा संतापले

संजय राऊतांवर निशाणा साधताना भुसेंनी घेतलं शरद पवारांचं नाव, अजितदादा संतापले

दादा भुसेंनी घेतलं शरद पवारांचं नाव, अजित पवार आक्रमक

दादा भुसेंनी घेतलं शरद पवारांचं नाव, अजित पवार आक्रमक

संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांना दादा भुसे यांनी विधानसभेत प्रत्युत्तर दिलं, पण त्यांनी शरद पवारांचं नाव घेतल्यामुळे अजित पवारांसह विरोधक चांगलेच आक्रमक झाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 मार्च : संजय राऊत यांनी शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांना दादा भुसे यांनी विधानसभेत प्रत्युत्तर दिलं, पण त्यांनी शरद पवारांचं नाव घेतल्यामुळे अजित पवारांसह विरोधक चांगलेच आक्रमक झाले, तसंच दादा भुसेंनी माफी मागावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

काय म्हणाले दादा भुसे?

'आम्हाला गद्दार म्हणाले, मात्र आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले. त्यांनी ट्वीट केलं, जर त्यात तथ्य असेल तर कारवाई करावी, नाहीतर खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीची शरद पवारांची चाकरी करतात. त्यांनी माफी मागावी, नाही तर त्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही,' असं दादा भुसे म्हणाले.

अजित पवार आक्रमक

दादा भुसे यांच्या या विधानानंतर अजित पवार चांगलेच संतापले. जे बोलायचं ते बोला पण शरद पवार यांचा उल्लेख केला आहे, तो करायला नाही पाहिजे. दादा भुसेंनी शरद पवारांच्या नावाचा उल्लेख केला तो मागे घेण्यात यावा. शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे. मोदी साहेब पवार साहेबांबद्दल काय बोलतात, हे आपल्याला माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले.

यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार वेलमध्ये आले आणि त्यांनी निदर्शन केली. दादा भुसे असं म्हणाले असतील तर ते तपासून कामकाजातून काढून टाकलं जाईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

दादा भुसेंचं स्पष्टीकरण

दरम्यान हा वाद वाढल्यानंतर दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'शरद पवारांचं योगदान देशाला माहिती आहे. ते कृषीमंत्री असताना घेतलेले निर्णय सगळ्यांना माहिती आहेत. पण आमच्या मतावर निवडून आलेले संजय राऊत आमच्यावर बोलतात, हे तुम्हाला चालेल का? माझं वक्तव्य तपासून पाहा, शरद पवारांबाबत मला आदर आहे, कोणताही अवमान केला नाही,' असं स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिलं.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Sanjay raut, Sharad Pawar