मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शरद पवारांच्या वाढदिवशी अजित दादा भावूक, वाचा त्यांचं संपूर्ण भावनिक भाषण

शरद पवारांच्या वाढदिवशी अजित दादा भावूक, वाचा त्यांचं संपूर्ण भावनिक भाषण

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार भावूक झाले. "मी खरंतर आज काय बोलायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मला आज जास्त काही बोलायचं सूचत नाहीय", असं अजित पवार दाटलेल्या आवाजात म्हणाले.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार भावूक झाले. "मी खरंतर आज काय बोलायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मला आज जास्त काही बोलायचं सूचत नाहीय", असं अजित पवार दाटलेल्या आवाजात म्हणाले.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार भावूक झाले. "मी खरंतर आज काय बोलायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मला आज जास्त काही बोलायचं सूचत नाहीय", असं अजित पवार दाटलेल्या आवाजात म्हणाले.

मुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज मुंबईत नेहरु सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना गहिवरुन आलं. त्यांनी दाटलेल्या आवाजात शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पवार कुटुंबासाठी हा प्रचंड भावनिक क्षण होता. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील असा भावनिक क्षण याआधीदेखील महाराष्ट्राने (Maharashtra) पाहिला आहे. त्यांच्या नात्यातिल भावनिक ओलावा आज पुन्हा महाराष्ट्राला बघायला मिळाला.

'जास्त काही बोलायचं सूचत नाहीय'

"मी खरंतर आज काय बोलायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मला आज जास्त काही बोलायचं सूचत नाहीय. पण माझ्या एकंदरीतच राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत शरद पवारांचे संस्कार, त्यांच्या सहवासातून मिळालेल्या विकासाच्या दृष्टीचा फार मोठा वाटा आहे. शरद पवारांची विकासाची दूरदृष्टी, दुरदम्य इच्छाशक्ती, मुत्सद्देगिरी, संकटातही पाय रोवून उभं राहण्याची वृत्ती ही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. समाजाच्या, राज्याच्या आणि देशाचा विकासाचा ध्यास आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. शरद पवार हे आपल्या सगळ्यांची प्रेरणा, स्फुर्ती आणि शक्ती आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने मी लाख लाख शुभेच्छा देतो", असं दाटलेल्या आवाजात म्हणत अजित पवारांनी आपलं भाषण संपवलं.

'शरद पवारांचा वाढदिवस म्हणजे...'

"शरद पवारांचा वाढदिवस म्हणजे महाराष्ट्राच्या जाणत्या नेत्याचा वाढदिवस. शेतकऱ्यांच्या पाठीराख्यांचा हा वाढदिवस. कष्टकरांचा, तारणहाऱ्याचा हा वाढदिवस. वंचित, उपेक्षितांसाठी लढणाऱ्याचा वाढदिवस. आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांसाठी निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याचा वाढिवस. महिला, बालक, युवकांना हक्क मिळवून देणाऱ्या प्रशासकाचा वाढदिवस. गेली साठहून अधिक वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र काम करणाऱ्या कर्मयोग्याचा आज वाढदिवस. राष्ट्रवादी काँग्रेसचे कुटुंबप्रमुख शरद पवारांचा वाढदिवस साजरा करत असताना पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:ला झोकून देवून काम करावं. पक्षासाठी, समाजासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा. शरद पवारांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा", असं आवाहन अजित पवारांनी केलं.

हेही वाचा : 'नोकरी देऊ शकत नसाल तर किमान थट्टा तरी करु नका', देवेंद्र फडणवीस संतापले

'शरद पवारांची नोंद घेतल्याशिवाय इतिहास लिहिता येणार नाही'

"शरद पवार यांच्या राजकारण आणि समाजकारणाबद्दल अनेकजण चर्चा करतात. या चर्चेत अनेक अभ्यासक त्यांच्या पद्धतीने विश्लेषण करतात. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा ठसा आहे. त्यामुळे त्यांची नोंद घेतल्याशिवाय महाराष्ट्र आणि देशाचा इतिहास लिहिता येणार नाही हे शरद पवार यांचं मोठेपण आहे", असं अजित पवार म्हणाले.

"शरद पवार देशाच्या राजकीय, सामाजिक, साहित्य, क्रिडा आणि सांस्कृतिक विश्वात अख्यायिका बनत आहेत. शरद पवारांच्या व्यक्तीमत्वाला हिमालयाची उंची आणि सह्याद्रीचा भक्कमपणा त्यांच्या राजकारणातील मुत्सद्दीपणा, विकासाची दूरदृष्टी, अहोराष्ट्र कष्ट करण्याचा स्वभाव, राजकारणाबरोबरच इतर क्षेत्रातला सहज वावर अशा अनेक गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. सर्वांकडे बारकाईन लक्ष देणं संस्कार देणं, सामाजिक जाणीव देणं, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रोत्साहन देणं, केवळ आम्हालाच नाही तर राज्यातील लाखो युवकांना शरद पवारांनी ताकद, बळ प्रोत्साहन देऊन सामाजाच्या विविध क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा दिली", असंदेखील अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : धनंजय मुंडेंची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली; भावूक Tweet करत लिहिलं, ''अप्पा... काळीज जड होते''

'वयाच्या 81 व्या वर्षीही कोट्यवधी तरुणांच्या हृदयातला नेता'

"लाखो तरुण मुलं शरद पवरांकडे आधारवड म्हणून बघतात. समाजासाठी योगदान देतात, हे आपण सगळे पाहतो आहेत. शरद पवार म्हणजे केवळ व्यक्ती नाहीत तर अनुभव आणि विचाराने विद्यापीठ आहेत. राज्यातील सर्वात तरुण काँग्रेस अध्यक्ष, सर्वात तरुण मुख्यमंत्री असे अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहे. शरद पवार यांनी नुकतीच राजकीय आणि सामाजिक जीवनाची 60 वर्षे पूर्ण केली. वयाच्या 81 व्या वर्षीही कोट्यवधी तरुणांच्या हृदयातला नेता, गळ्यातील ताईत बनून राहण्याची जादू शरद पवारांनी करुन दाखवली. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना ते सर्वार्थाने आदर्श आहेत", अशा भावना अजित पवारांनी व्यक्त केल्या.

First published:
top videos