राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

ष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी पाठिंबा दिला.

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षेनेतेपदासाठी अनेक नावं चर्चेत होती. यामध्ये जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळांसह अन्य काही नेत्यांची नावेही चर्चेत होती. मात्र अखेर अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीची आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पवार, ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, ज्येष्ठ नेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड आणि पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार, विधान परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा पूर्ण होत आला तरीही सत्ता स्थापनेचा गोंधळ मात्र अद्यापही संपलेला नाही. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागा कमी झाल्यानंतर शिवसेनेनं आता थेट मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. मात्र भाजपचे नेतृत्व शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास अनुकूल नाही. असं असलं तरीही सत्तेत आपलं वजन वाढवण्यासाठी शिवसेनेकडून अजूनही हालचाली सुरूच आहेत.

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 06:32 PM IST

ताज्या बातम्या