मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...आणि अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जोडले हात, हे आहे कारण

...आणि अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जोडले हात, हे आहे कारण

'घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र हात जोडूनच नमस्कार करा'

'घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र हात जोडूनच नमस्कार करा'

'घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र हात जोडूनच नमस्कार करा'

बारामती 08 मार्च :  कोरोनामुळे जगभर चिंतेचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. तर डॉक्टरांनीही गर्दी टाळण्याचा तसेच हस्तांदोलन न करण्याचा सल्ला दिलाय. त्याचा परीणाम सर्वच स्तरावर दिसून येतोय. कोरोनापासून जागरुकता राखण्याचा प्रयत्न जसे नागरीक करत आहेत तिच जागरुकता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दाखविली. बारामतीत झालेल्या आज विविध कार्यक्रमांदरम्यान अजित पवार यांनी एकाही व्यक्तीच्या हातात हात न देता हात जोडून नमस्कार करणेच पसंत केले.

अजित पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री झाल्याने मी काही वेगळा झालो आहे असे काहींना वाटेल पण डॉक्टरांनीच दिलेल्या सल्ल्यानुसार हस्तांदोलन टाळून हात जोडून नमस्कार करीत असल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला. बारामतीत आज झालेल्या विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले त्यावेळी  अजित पवार यांनी हा खुलासा केला. पवार यांच्या हस्ते आज बरेच सत्कार झाले, अनेकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्नही केला, मात्र हात जोडून पवार यांनी नम्रतेने व हसत हस्तांदोलन टाळले.

डॉक्टर एकीकडे तुम्हीच सांगता हस्तांदोलन करु नका आणि तुम्ही हस्तांदोलन करण्याचा आग्रह करता, असे म्हणत त्यांनी डॉक्टरांनाही हळूच चिमटा काढला. मात्र जो पर्यंत कोरोना संपूर्णपणे जात नाही तो पर्यंत आपण हस्तांदोलन करणार नाही, असा खुलासा करायलाही अजित पवार विसरले नाहीत. तुम्हीही हात जोडूनच नमस्कार करा, घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र हात जोडूनच नमस्कार करा असे ते म्हणताच हास्याचा स्फोट झाला.

हेही वाचा..

‘तुम्हाला मते देऊन फायदा झाला नाही’, कामगारांचा अमोल कोल्हेंसमोर तक्रारीचा पाढा

कोरोनाची इडा पीडा टळू दे, शिर्डीत महिलांनी सर्व शहरा भोवती काढली पीठाची रांगोळी

मुलाने विचारलं आई तू का हरली? पंकजा मुंडेंनी दिलं हे उत्तर

First published:

Tags: Ajit pawar