सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अजित पवारांची मागणी

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अजित पवारांची मागणी

देशाचे कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाची थट्टा करतात. त्यामुळं आता शेतकऱ्यांनी भाजपला थारा देऊ नये असं आवाहन करतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

  • Share this:

03 मे : देशाचे कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाची थट्टा करतात. त्यामुळं आता शेतकऱ्यांनी भाजपला थारा देऊ नये असं आवाहन करतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. लोकमंगल संस्थेच्या माध्यमातून केलेला कर्ज घोटाळा, अग्निशमन केंद्राच्या जागेवरील बंगला अशी अनेक प्रकरणं असताना इतरांप्रमाणेच सुभाष देशमुख यांनाही पदावरून दूर केलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

बारामतीत आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा आणि सरपंच व नवनियुक्त सदस्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी देशाचे कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कृषिमंत्री जर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची थट्टा करत असतील, तर त्यांना आता शेतकऱ्यांनी थारा देऊ नये असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

याचवेळी त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केलीय. कोणताही घोटाळा समोर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जातात. मग सुभाष देशमुख यांनाच वेगळा न्याय का असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय.

 

First published: June 3, 2018, 5:03 PM IST

ताज्या बातम्या