एक दिवस किक मारून फुटबाॅल खेळता येईल का?- अजित पवारांची तावडेंवर टीका

एक दिवस किक मारून फुटबाॅल खेळता येईल का?- अजित पवारांची तावडेंवर टीका

पुढे बोलताना ते म्हणाले, शिक्षणाचा बाजार मांडलाय. विनोद तावडेंचं नाव न घेता ते म्हणाले, 'बोगस डिग्री असणारा कसा काय शिक्षण विभाग सांभाळू शकतो?'

  • Share this:

पुणे, 18 सप्टेंबर : एक दिवस 10 लाख मुलं फुटबॉल खेळून,किक मारून फुटबॉल खेळता येईल का,महाराष्ट्र फुटबॉलमय होईल का?  अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता विनोद तावडेंवर टीका केलीय. पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे विविध पुरस्कारांचं अजित पवार यांच्या हस्ते वितरण झालं. त्यावेळी ते बोलत होते.

क्रीडाशिक्षक, bpdची भर्ती बंद आहे.  मुंबई विद्यापीठाचे निकाल अजून लागले नाहीत, कोणता धडा असावा,वगळावा यात हस्तक्षेप होतोय, शिक्षण क्षेत्राची थट्टा होतेय, असे बरेच मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले.

पुढे बोलताना ते म्हणाले, शिक्षणाचा बाजार मांडलाय.  विनोद तावडेंचं नाव न घेता ते म्हणाले, 'बोगस डिग्री असणारा कसा काय शिक्षण विभाग सांभाळू शकतो?' आपल्या भाषणात अजित पवारांनी कडाडून टीका केलीय.

First published: September 18, 2017, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading