मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'अजून सुरुवातही झाली नाहीय आणि तुम्हाला एवढी मस्ती आली?', अजित पवार भडकले

'अजून सुरुवातही झाली नाहीय आणि तुम्हाला एवढी मस्ती आली?', अजित पवार भडकले

अजित पवार

अजित पवार

"हे सरकार अजून येऊन काही दिवस झाले आहेत, असं असताना यांच्यातले काही आमदार हे अक्षरश: महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशाप्रकारची भाषा वापरत आहेत", असं अजित पवार म्हणाले.

    मुंबई, 16 ऑगस्ट : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांवर विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकले. शिवसेनेच्या एका आमदाराने शिसैनिकांना मारहाण करण्याचे आदेश दिले होते, असा दावा पवारांनी केला. तसेच शिवसेनेचे आमदार संतोष बागर यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याची घटना ताजी आहे. या घटनांवर अजित पवारांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेतील काही आमदारांची आणि हिंसक वर्तवणुकीचं समर्थन करतात का? असा सवाल अजित पवारांनी केली. तसेच सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का? कायदा हातात घेतला जातोय. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पटतंय काय? असे सवाल अजित पवारांनी केले आहेत. "हे सरकार अजून येऊन काही दिवस झाले आहेत, असं असताना यांच्यातले काही आमदार हे अक्षरश: महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशाप्रकारची भाषा वापरत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा. शिवसैनिकांचे हात तोडा, तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथडा काढा. अरे काय ही पद्धत? कुठे शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र, कुठे आपले पहिले मुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला, ज्यांनी नेहमी काम करताना कशा पद्धतीने राजकारण केलं पाहिजे, संस्कार कशा पद्धतीने झाले पाहिजेत, असं शिकवलं त्याच यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रामध्ये तोडा-फोडा-मारा ही पद्धत वापरली जातेय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना हे पटतंय का? भाजपला पटतंय?", असे प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केले. (मविआने करून दाखवलं, दारूमुळे दुप्पट महसूल जमा, आता वाईन विक्रीचं काय होणार? शंभूराजे देसाई म्हणाले...) "एका बहाद्दर शिंदे गटाच्या आमदाराने सरकारच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागले. म्हणजे तुम्ही काय समजता, सरकार आलं म्हणजे मस्ती आली का तुम्हाला? शेवटी कुणीही व्यक्ती असली तरी सर्वांना संविधान, कायदा, नियम सारखे. त्यापेक्षा कुणीही मोठा नाही. या पद्धतीची भाषा? अजून तर कुठे सुरुवात झालेली नाहीय आणि त्यांना एवढी मस्ती आलेली आहे. त्यांना थांबवलं कसं जात नाही? त्यांना दोन गोष्टी सांगून थांबवण्याचं काम नाहीय का? महाराष्ट्र हा उघड्या डोळ्यांनी सारं पाहतोय", असं अजित पवार संतापात म्हणाले. "आपण स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सवी साजरी करत असताना स्वातंत्र्यदिनी एक आमदार अशाप्रकारचे भाषा वापरतो? तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी अशाप्रकारची भाषा वापरत असाल तर चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या नागरिकांचं काय? या गोष्टींतून महत्त्वाच्या प्रश्नांवर बगल देण्याचं काम सरकारने करु नये", अशी टीका अजित पवारांनी केली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde, NCP, Shiv sena

    पुढील बातम्या