Home /News /maharashtra /

अजित पवार पुन्हा नाराज? आणखी एका महत्त्वाच्या समितीचं सोडलं अध्यक्षपद

अजित पवार पुन्हा नाराज? आणखी एका महत्त्वाच्या समितीचं सोडलं अध्यक्षपद

मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या समितीतून उपमुख्यंत्र्यांना वगळलं ....

    अहमदनगर, 20 नोव्हेंबर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी आखणी एका महत्त्वाच्या समितीचं अध्यक्षपद ( committee Commiti Chairman) सोडलं आहे. राज्यातील आजारी साखर कारखाने (Sugar Factory) भाडेतत्वावर देण्यासाठीच्या मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्षपदाचा अजित पवार यांनी सोडलं आहे. याआधी अजित पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांना बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून हमी देण्यासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद गेल्या महिन्यात सोडलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. साखर कारखाने भाडेतत्वावर देण्यासाठीच्या मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्षपदाची जबाबदारी आता सहकार मंत्र्याकडे असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा...ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, 100 युनिट वीज माफीचा शब्द पाळणार; पण... 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यातील सरकारी साखर कारखाने भाडेतत्वावर चालविण्यास देणे, विक्री करणे यासंबंधी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. यासंबंधी आरोप-प्रात्यारोप सुरू असतानाच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याच विषयावर थेट कोर्टात धाव घेतली आहे. ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर यासंबंधीच्या 2016 च्या निर्णयात बदल करण्यात आला होता. अवसायानात काढलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्वावर चालविण्यास देण्यासाठी मंत्रिमंडळ समितीत बदल करण्यात आला होता. जुलै 2020 मध्ये यात सुधारणा करून समितीचे अध्यक्ष सहकार मंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री असतील, अशी सुधारणा करण्यात आली होती. तर सहकार मंत्री, सहकार राज्यमंत्री, अपर मुख्य सचिव हे सदस्य होते. तर साखर आयुक्त सदस्य सचिव होते. मात्र, आता या समितीमध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. ही समिती पुन्हा पाच जणांचीच करण्यात आली आहे. त्यामुळे उपमुख्यंत्र्यांना त्यातून वगळ्यात आलं आहे. आता पूर्वीप्रमाणेच सहकार मंत्री समितीचे अध्यक्ष असणार आहेत. दरम्यान, मधल्या काळात असे साखर कारखाने भाडेतत्वावर देण्यासंबंधीच्या नियमावलीतही काही बदल करण्यात आले आहेत. आता त्यानुसार पुढील प्रक्रिया होणार आहे. समितीच्या आगामी बैठकीत नव्या नियमांप्रमाणेच प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हेही वाचा...कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत, अन्.. अण्णा हजारेंनी केले होते गंभीर आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकरणी पवार कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे. सरकारी तिजोरीचे तब्बल 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजाही एक लाख कोटी रुपयांहून अधिक वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी कटकारस्थानाने हा संपूर्ण घोटाळा केला, असा आरोप करत हजारे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Ajit pawar, Maharashtra, Sharad pawar, Sugarcane farmer

    पुढील बातम्या