मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काकांच्या कार्यक्रमाला पुतण्या आणि नातू गैरहजर!

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काकांच्या कार्यक्रमाला पुतण्या आणि नातू गैरहजर!

या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित आहे. मात्र अजित पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित आहे.

या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित आहे. मात्र अजित पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित आहे.

या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित आहे. मात्र अजित पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित आहे.

पिंपरी चिंचवड, 17 ऑक्टोबर : महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या (sharad pawar) उपस्थितीत मेळावा होत आहे. या मेळाव्याला मात्र राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) गैरहजर आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पार्थ पवारही या मेळाव्याला आले नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची मेळावा पार पडत आहे.  या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित आहे. मात्र अजित पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित  आहे. अजितदादा आणि पार्थ पवार गैरहजर आहे.  शरद पवारांचे जुने कार्यकर्ते कार्यक्रमाच्या आणि आयोजनाच्या केंद्रस्थानी आहे. Bigg Boss फेम या अभिनेत्रीला गंभीर दुखापत, चालणंही झालंय कठीण विशेष म्हणजे,  शरद पवार हे  2004 नंतर तब्बल 17 वर्षांनी पिंपरी-चिंचवडचा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्याआधी शरद पवार हे पंधरा वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवड भागाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत होते. मात्र काही जुन्या मंडळींचा संपर्क वगळता पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात त्यांनी कधीही लक्ष घातलं नाही. इथली जबाबदारी कायम अजित पवार यांच्यात खांद्यावर होती. 2016 च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीचा पराभव झाला होता पाठोपाठ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मावळ लोकसभेतून पराभव झाला होता. त्यानंतर सरकार आल्यावर ही पिंपरी चिंचवड मधल्या राष्ट्रवादीची मरगळ काही केल्या संपत नव्हती. Team India चा कोच होण्यासाठी पूर्ण कराव्या लागणार या अटी, BCCI ने दिली जाहिरात महापालिका निवडणुका 4 महिन्यांवर येऊन ठेपल्या नंतरही महापालिकेत सत्तांतर होईल, असं कुणी खात्रीने सांगू शकत नाही, स्थानिक राष्ट्रवादीत तसा कुठलाही जोर दिसत नाही. गटबाजीने पोखरलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा रुळावर आणा असे साकडे घालत काही जुनी मंडळी गाऱ्हाणं घेऊन शरद पवारांकडे गेली आणि पवार यांनी थेट पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा लावला. शरद पवार यांनी अनेकांना भेटीगाठीसाठी बोलावलं मात्र या सगळ्या दरम्यान अजित पवार आणि अलीकडच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालणारे पार्थ पवार यांच्या नेतृत्वावर पवार आणि प्रश्नचिन्ह लावलाय का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यामुळे शरद पवार या मुद्यावर काय भूमिका मांडतात हे पाहण्याचे ठरणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: NCP, Sharad pawar, शरद पवार

पुढील बातम्या