अजित पवार आणि गिरीश महाजनांमध्ये शाब्दिक चकमक, विधानसभेत वादंग

अजित पवार आणि गिरीश महाजनांमध्ये शाब्दिक चकमक, विधानसभेत वादंग

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

  • Share this:

मुंबई, 20 जून : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवशी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. उजनीच्या पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

'सोलापूरसाठी काय आज पाणी उजनीतून उचलत आहोत का? हे तर पूर्वीपासूनच सुरू आहे,' असं म्हणत गिरीश महाजन यांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे. अजित पवारही या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

विधानसभेत जोरदार खडाजंगी

पावसाळी अधिवेशनामध्ये कालही सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. गणितात जोडाक्षरं टाळण्यावरूनही राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची तुफान फटकेबाजी केली. बावनकुळेंना 502कुळे असं म्हणायचं का? किंवा फडणवीसांना फडण20 असं म्हणायचं का? अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली.

दुसरीकडे, विधानपरिषेदत मुख्यमंत्री आणि अनिल परब आमने सामने आले. कल्याण डोंबिवलीतील कर बुडव्यांवर आणि त्यांना वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, करबुडव्यांना पाठीशी घातलं जातं आणि अधिकारी त्यांच्याकडून पैसे उकळतात अशा अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली जाते, असा आरोप अनिल परब यांनी केला. त्यावर, याबाबत पुन्हा एकदा तपास करू, सविस्तर चौकशी करु असं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

उद्धव ठाकरेंचा पवार कुटुंबियांना टोला, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: June 20, 2019, 11:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading