बँक घोटाळा : अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दणका, अटकेची टांगती तलवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. त्यामुळे अजित पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 09:52 PM IST

बँक घोटाळा : अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दणका, अटकेची टांगती तलवार

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. त्यामुळे अजित पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह सर्व माजी संचालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या सगळ्यांचा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न होता. काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर अटकेची कारवाई झालीच तर संरक्षण मिळावं यासाठी हा प्रयत्न असल्याचं बोललं जात होतं.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 31 बँक संचालकांविरुद्ध पोलिसांनी सोमवारी गुन्हे दाखल केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरून कोर्टाने काही दिवसांपूर्वीच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.

... तर राष्ट्रवादी दिसणारच नाही, अमित शहांचा पवारांवर घणाघात

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अत्यंत मनमानी पद्धतीने कर्जवाटप केलं होतं. या कर्जवाटपामुळे बँकेला 10 हजार कोटींचा फटका बसला होता. या घोटाळ्याप्रकरणी अण्णांनी तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. नंतर त्यावर चौकशी समितीही नेमली गेली होती. त्याच्या अहवालनंतर कोर्टानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

Loading...

काय आहे राज्य सहकारी बँकेचा घोटाळ्याचा आरोप?

- 2005 ते 2010 या कालावधीत राज्य सहकारी बँकेवर वर्चस्व असणाऱ्या संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्जाचे वितरण केलं.

- राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखाने सूतगिरणी मिल यासह अनेक सहकारी संस्थांना कर्जाचं वाटप केलं गेलं.

- हे सर्व कर्ज नियमबाह्य पद्धतीने दिले गेले. साधारण त्याची रक्कम पंधराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

- अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले. यावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.

- राज्य सहकारी बँकेला या सर्व प्रकरणामुळे आर्थिक नुकसान तर झालेच पण स्वतःच्या सहकारी संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत मोठ्या प्रमाणात फायदा मिळवल्याचा आरोप या याचिकेत केला गेला आहे.

==================================================================================================

Ganesh Chaturthi 2019: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिद्धिविनायकाच्या चरणी, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 01:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...