मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नव्या वर्षाचा फस्ट डे फर्स्ट शो, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर!

नव्या वर्षाचा फस्ट डे फर्स्ट शो, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर!

 नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणे पालिकेकडून विकासकामाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार आहे.

    अमरावती, 31 डिसेंबर : पहाटेच्या शपथविधीमुळे एकत्र आलेले भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांची जोडी राज्याचा राजकारणात कायम चर्चेची ठरली. आता नव्या वर्षात दोन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र येत आहे, पण ते एका कार्यक्रमाचा निमित्ताने. पुणे पालिकेकडून विकासकामाच्या लोकार्पण सोहळ्याला दोन्ही नेते हजर राहणार आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणे पालिकेकडून विकासकामाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार आहे.  भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचे 1 जानेवारी रोजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. परंतु, उद्घाटनापूर्वी पुणे पालिकेतील भाजपचे सत्ताधारी आणि विरोधक राष्ट्रवादी यांच्यामध्ये उद्घाटनावरून वाद पेटला होता. अखेर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मध्यममार्ग स्वीकारत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला. पुणे पालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, तमिळनाडूतील दरोडेखोरांची टोळी जेरबंद दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एकाच मंचावर एकत्र येत आहे. यावर फडणवीस यांनी माध्यमांवर टीकास्त्र सोडले. 'दोन भिन्न पक्षाचे नेते एकत्र आले की किंवा भेट घेतली तर हे कोण्या पक्षात जाणार संकुचित विचार करणे, सोडले पाहिजे शासकीय कार्यक्रमात आम्हाला जावेच लागतं, सरकार जेव्हा बनायचे  तेव्हा बनेल, असं वक्तव्य फडणवीस यांनी केले. तसंच, देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या महाराष्ट्रासह देशाच्या जनतेला शुभेच्छा देत राज्यातले व देशावरचे संकट दूर व्हावे ही अपेक्षा करत शेतकऱ्यांवर चे संकट दूर होऊन सुखासमाधानाने जावे. सोबतच महाविकास आघाडी सरकारला नवीन वर्षात सद्बुद्धी मिळावी चांगले काम करण्यासाठी ईश्वराने त्यांना शक्ती प्रदान करावी, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली. तर राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत महाआघाडी सरकार याबाबत गंभीर नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलीसच पीडित महिलेला किंवा अल्पवयीन मुलीवर दबाव आणत गुन्हे दाखल करून घेत नसल्याचा आमच्या महिला आघाडीने आम्हाला सांगितलं आहे, हा प्रकार राज्यासाठी बरोबर नव्हे असं देखील फडणवीस यांनी सांगितले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या