मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवारांनी केला सोबत विमानातून प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवारांनी केला सोबत विमानातून प्रवास

सत्ताधारींसह विरोधी पक्षातीलही अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र आपला हा दौरा अखेरच्या क्षणापर्यंत कमालीचा गोपनीय ठेवला होता.

  • Share this:

 औरंगाबाद, 22 नोव्हेंबर:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल चक्क एकत्र प्रवास केला. औरंगाबादमध्ये पार  औरंगाबादमध्ये पार पडलेल्या एका विवाहसमारंभासाठी ते दोघं सोबत गेले.

सत्ताधारींसह विरोधी पक्षातीलही अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र आपला हा दौरा अखेरच्या क्षणापर्यंत कमालीचा गोपनीय ठेवला होता. मुंबईहून रात्री खास विमानाने ते थेट चिकलठाणा विमातळावर उतरले तेव्हा त्यांच्यासोबत अजित पवारही होते. विमानातून उतरल्यावर वाहनापर्यंत जाताना दोघांनी विशिष्ट अंतर राखले. तरीही दोघे एकाच सफारी वाहनात बसले! 'सफारी' तून उतरल्यावर समारंभस्थळी जाताना, वधू-वरांना शुभेच्छा देताना, अल्पोपाहार घेवून तेथून बाहेर पडतानाही दोघांनी एकमेकांमध्ये विशिष्ट अंतर राखले. चिकलठाणा विमानतळाकडे मार्गस्थ होताना मात्र हे दोन नेते पुन्हा एकाच सफारी कारमध्ये बसले!  ज्या विमानातून आले त्याच  विमानातून रात्री दहाच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले. विशेष म्हणजे विमान व कारमध्ये या दोघांशिवाय अन्य कुणीही नव्हते.

त्यामुळे आता या दोघांमध्ये कुठली नवी युती होते  आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 11:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading