कल्याण- डोंबिवलीकरांसाठी खूशखबर! ऐरोली-मुंब्रा 12 किमीचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत

कल्याण- डोंबिवलीकरांसाठी खूशखबर! ऐरोली-मुंब्रा 12 किमीचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत

ऐरोली-मुंब्रा जलद मार्ग सप्टेंबर 2021 मध्ये खुला होणार

  • Share this:

ठाणे, 20 नोव्हेंबर: नवी मुंबईमार्गे कल्याण-डोंबिवलीला जाणाऱ्या वाहनचालकांचा ट्रॅफिकमध्ये अडकून प्रचंड वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून थेट ऐरोलीपासून मुंब्रापर्यंत बोगदा खोदून नवीन रस्ता बांधण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.

12 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा हा रस्ता आहे. त्यात वारंवार खोळंबा. मात्र, ऐरोली-मुंब्रा बोगदा केवळ 1.8 किलोमीटरचा आहे. त्यामुळे 12 किलोमीटरचा प्रवास आता लवकरच 10 मिनिटांत होणार आहे. ऐरोली-मुंब्रा जलद मार्ग सप्टेंबर 2021 मध्ये खुला होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा...मुंबईप्रमाणे 'या जिल्ह्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार, पालकमंत्र्यांनी दिले निर्देश 

ऐरोली-मुंब्रा हा महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा रस्त्याचा बोगदा असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाउनमध्ये अतिशय मंद गतीने सुरू असलेल्या कामाचा आढावा खासदार श्रीकात शिंदे यांनी घेतला. यातील बोगद्यासह पहिल्या टप्प्याचे कामचे काम सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच याच कामातील दुसरा टप्पा म्हणजेच एलिव्हेटेड मार्गाचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असल्याचे शिंदे म्हणाले.

ऐरोली ते मुंब्रा वाय जंक्शन आणि मुंब्रा वाय जंक्शन ते कटाई अशा दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी 1.8 किलोमीटरचा बोगदा बनवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील रस्ता हा ऐरोलीच्या खाडी पुलाजवळ सुरू होईल तो थेट मुंब्र्यातील वाय जंक्शनपर्यंत असेल.

दुसऱ्या टप्प्यात याच रस्त्याला जोडून एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यात येईल जो थेट कटरीना इथे उतरेल. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा कल्याण-डोंबिवली- अंबरनाथ-बदलापूर येथील रहिवाशांना होणार आहे. कारण, या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर काटई ते ऐरोली हा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. शिळ फाटा आणि त्याच्या आजूबाजूला प्रवास करणारे करणारे सर्व वाहनचालक रडकुंडीला आलेले आहेत.

हेही वाचा... शिवसेनेच्या वचननाम्याची होळी... आप आदमी पक्षानं ठाकरे सरकारवर साधला निशाणा

कल्याण-डोंबिवली आणि पुढे अंबरनाथ बदलापूरपर्यंत मोठी गृहसंकुले निर्माण होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे नवी मुंबई आणि मुखतः मुंबईला जोडण्यासाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. या पाहणी दौऱ्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी उन्नत मार्ग 1 ( फेज 1 ) - टनेल टप्पा 1 ( टनेल फेज 1 ) या दोन कामांची पाहणी करत नियोजित वेळेच्या आधीच ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे निर्देश खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले.

Published by: Sandip Parolekar
First published: November 20, 2020, 8:41 PM IST

ताज्या बातम्या