सोलापुरात लोकनेते बाबूराव पाटील कारखान्यात वायू गळती, 2 कामगार ठार, 8 जखमी

मोहोळ येथील लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंड्रस्ट्रीज कारखान्यात बायोडायजेस्टरच्या टाकी कोसळून फुटली. ही घटना रविवारी पहाटे 3.30 च्या सुमारास घडली.

मोहोळ येथील लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंड्रस्ट्रीज कारखान्यात बायोडायजेस्टरच्या टाकी कोसळून फुटली. ही घटना रविवारी पहाटे 3.30 च्या सुमारास घडली.

  • Share this:
  सोलापूर, 22 नोव्हेंबर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या लोकनेते बाबूराव पाटील अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये (loknete baburao patil agro industries ltd) टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर 8 कामगार (Workers) जखमी झाले आहे. जखमी कामगारांना तातडीने सिद्धेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहोळ येथील लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंड्रस्ट्रीज कारखान्यात बायोडायजेस्टरच्या टाकी कोसळून फुटली. ही घटना रविवारी पहाटे 3.30 च्या सुमारास घडली. मराठा समाजाला दिलासा, EWS मधून प्रवेश घेण्यास कोर्टाची परवानगी, पण... कारखान्यात काम सुरू असताना अचानक पहाटे बायोडायजेस्टरची टाकी खाली कोसळली. त्यामुळे घटनास्थळावर काही कर्मचाऱ्यांनी धावाधाव केली. टाकी खाली कोसळल्यानंतर फुटली. टाकी फुटल्यानंतर मिथेन गॅस आणि द्रवरुप लिक्विड पदार्थ बाहेर पडले. त्यामुळे घटनास्थळावर वायू गळती झाली. गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या प्रियकराला घरच्यांनी मारलं, सकाळी त्याला केलं जावई यात काम करणारे 10 कर्मचारी सापडले. घटनास्थळावर दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले. या दुर्घटनेमध्ये ज्योतीराम दादा वगरे (वय 45, राहणार बिटले, मोहोळ ) आणि सुरेश अंकुश चव्हाण (वय 22, रा. बिटले, मोहोळ) या दोन्ही कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर आठ कामगारांना सोलापूर सिध्देश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published: