पुणे विमानतळावर एअर इंडियाचं विमान थोडक्यात बचावलं, जीपचालकच आला धावपट्टीवर!

पुणे विमानतळावर एअर इंडियाचं विमान थोडक्यात बचावलं, जीपचालकच आला धावपट्टीवर!

एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर असताना अचानक एक व्यक्ती जीपसह आढळून आल्यामुळे अपघात घडला आहे.

  • Share this:

पुणे, 15 फेब्रुवारी : पुणे  आंतरराष्ट्रीय विमानतळावर  एअर इंडियाचे विमानला मोठा अपघात थोडक्यात टळला आहे. एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर असताना अचानक एक व्यक्ती जीपसह आढळून आल्यामुळे अपघात घडला आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे A-321 हे विमान श्रीनगरसाठी उड्डाण भरण्यासाठी सज्ज झाले होते. विमान धावपट्टीवर टेक ऑफ करण्याच्या तयारीत निघाले होते. धावपट्टीवर 222 किमी/प्रति तास इतका वेग विमानाचा होता. नेमकं त्याचवेळी पायलटला धावपट्टीवर एक व्यक्ती  जीपसह आढळून आला. आता या वेगात विमानला जरा इर्मजन्सी ब्रेक लावले असत तर जीपला धडक बसली असती. त्यामुळे समयसुचकता दाखवत पायलटने धावपट्टी पूर्ण होण्याआधीच टेकऑफ केलं.

सुदैवाने विमानाचं वेळीच टेकऑफ झालं. विमानने वेळीच टेकऑफ केलं पण, त्याचवेळी विमानाचा मागील भाग हा जीपला घासून गेला. विमानाने यशस्वी टेकऑफ केलं, यात कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. हा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर सदरील विमान एअर इंडियाने चौकशीसाठी ताब्यात घेलं आहे.

या दुर्घटनेमध्ये विमानाचे इंधन टाकीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर या विमानाला कुठेही इर्मजन्सी लँडिंग करावे लागले नाही. दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आलं.

घडलेल्या या प्रकारावर एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नेमका हा प्रकार कसा आणि का घडला या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती धनंजय कुमार यांनी दिली. तसंच या विमानाला चौकशी होईपर्यंत सेवेतून हटवण्यात आलं आहे.

First published: February 15, 2020, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading