MIM च्या आमदाराची गुंडगिरी; समर्थकांकडून डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण, VIDEO समोर

MIM च्या आमदाराची गुंडगिरी; समर्थकांकडून डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण, VIDEO समोर

आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती.

  • Share this:

मालेगाव, 26 मार्च : सामान्य रुग्णालयात घातलेला गोंधळ एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांना भोवला आहे. आमदारांसह त्यांच्या 10 समर्थकांवर कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती.

आमदार मुफ्ती इस्माईल यांनी काल रात्री आमदार मुफ्ती यांच्या समक्ष त्यांच्या समर्थकांनी सामान्य रुग्णायलातील वैद्यकीय अधीक्षकांसह इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केली होती. त्यानंतर डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर आता आमदारा आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सामान्य रुग्णालयात आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या ओळखीतील दोन रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टर चालढकल करत होते, असा आमदारांचा आरोप आहे. याप्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

First published: March 26, 2020, 12:17 PM IST

ताज्या बातम्या