महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: नेत्याने सभा झाल्यानंतर केला डान्स; व्हिडीओ Viral

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: नेत्याने सभा झाल्यानंतर केला डान्स; व्हिडीओ Viral

सभा झाल्यानंतर नेत्याने केला डान्स...

  • Share this:

औरंगाबाद, 19 ऑक्टोबर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी(Maharashtra Assembly Election 2019)च्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोप ऐकायला मिळत असताना एका नेत्याने चक्क सभात डान्सच केला आहे. नेहमी आक्रमक भाषणामुळे चर्चेत राहणारे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi)यांनी औरंगाबाद येथील एका सभेत चक्क डान्स केला. हैदराबादचे खासदार असलेले ओवैसी सध्या महाराष्ट्रात विधानसभेसाठी प्रचार करत आहेत. औरंगाबाद येथील एका सभेत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. सभेत भाषण केल्यानंतर ओवैसी स्टेजवरून खाली उतरत होते तेव्हा एक गाणं सुरु होते. ओवैसी यांनी या गाण्यावर डान्स केला.

ओवैसी यांच्या या डान्स हा व्हिडीओ अगदी लहान असला तरी सध्या सोशल मीडिया(Social Media) वर व्हायरल होत आहे. ओवैसी हे नेहमी त्यांच्या आक्रमक भाषणामुळे चर्चेत असतात. संसदेत असो की एखाद्या सभेत ओवैसी नेहमीच मोदी सरकार, भाजप यांच्यावर जोरदार टीका करतात. याच गोष्टीमुळे ते चर्चेत देखील असतात. पण औरंगाबाद येथील सभेत ओवैसी यांचे आतापर्यंत कधीच न पाहण्यात आलेले रुप पहायला मिळाले. 17 ऑक्टोबर रोजीचा हा व्हिडीओ औरंगाबादमधील एका सभेचा आहे.

ओवैसी यांच्या पक्षाने यंदा महाराष्ट्र विधानसभेत जोर लावला आहे. त्यातही औरंगाबाद या भागात त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला येथून विजय मिळाला होता. तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून AIMIMचा उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे पक्षाने यावेळी देखील औरंगाबादवर विशेष लक्ष दिले आहे.

श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल लागू करा

औरंगाबाद येथील सभेतील ओवैसी यांच्या व्हिडीओची चर्चा भलेही झाली असली तरी या सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींनी श्रीकृष्ण आयोग लागू करण्याची मागणी केली. 1993मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीनंतर श्रीकृष्ण आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.

VIDEO : राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना थेट सवाल, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 09:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading